Monday, 22 May 2023

'अजिनो मोटो' हा काय पदार्थ आहे व त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो?

'अजिनो मोटो' हा काय पदार्थ आहे व त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो?

तरुणाईची विशेष पसंती मात्र चायनीज पदार्थांना आहे. नूडल्स, मन्चुरिअन, फ्राइड राइस आणि विविध प्रकारचे चायनीज खाद्यपदार्थ तरुणाईला आवडते. 
चायनीज पदार्थ लोकप्रिय होण्यामध्ये अजिनोमोटो महत्त्वाचं आहे. अगदी अलीकडच्या काळात भारतात अजिनोमोटोबद्दल माहिती झालं असलं,तरी त्यातले पदार्थ मात्र भारतीयांसाठी नवीन नाहीत. 
अजिनोमोटोमध्ये ग्लुटॅमिक ॲसिड असतं.
उसाची मळी किंवा बिटाच्या मळीमध्ये अमोनियम सॉल्ट वगैरे एकत्र करून अजिनोमोटो बनवलं जातं. 
अजिनोमोटो नेहमी खाल्ल्यास त्यामुळे त्रासही होऊ शकतो, असं अनेक संशोधनातून समोर आलं आहे.
 अजिनोमोटोला चायनीज सॉल्टही म्हटलं जातं. त्याचं मूळ नाव मोनो सोडिअम ग्लुटामेट असं आहे. 
गंमत म्हणजे अजिनोमोटो हे कोणत्याही पदार्थाचं नाव नाही, तर जी कंपनी हे बनवते तिचं नाव अजिनोमो आहे; पण अजिनोमोटो या नावानंच हा पदार्थ प्रसिद्ध आहे. याचा वापर चायनीज पदार्थांमध्येच जास्त केला जातो. 
याची चव एरव्हीच्या सर्वसामान्य मिठापेक्षा अगदी वेगळी असते.
सहसा आपल्याला गोड, आंबट, तुरट, खारट, कडू, तिखट या चवी माहिती आहेत; पण अजिनोमोटोची चव मात्र यापेक्षा पूर्णपणे वेगळी असते. 
या चवीमुळेच तर चायनीज पदार्थांना खास अशी चव मिळते. घरी अगदी सगळं तसंच साहित्य वापरून चायनीज डिशेस केल्या तरी त्याला बाहेर मिळणाऱ्या चायनीज पदार्थांची चव येत नाही. 
आपल्याकडे अगदी रेस्टॉरंटपासून ते साध्या स्टॉलवर मिळणाऱ्या चायनीजची चव अगदी खास वेगळीच लागते. अर्थातच त्यामागचं सिक्रेट आता तुम्हाला कळलं असेल, ते आहे अजिनोमोटो.
मात्र या सर्वापेक्षा मोनोसोडियम ग्लुटामेटचा सर्रास वापर शरीराचे सगळ्यात जास्त नुकसान करणारा आहे. ‘अजिनोमोटो’ नावाची कंपनी तयार करीत असलेल्या ‘फ्लेव्हर एन्हान्सर’चे शास्त्रीय नाव ‘मोनोसोडियम ग्लुटामेट’ असून त्यात सोडियम, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन व ऑक्सिजन ही मूलद्रव्ये असतात. व्हिनेगरप्रमाणेच अजिनोमोटोही आंबवण्याच्या प्रक्रियेतून तयार होते. 
अनेक भाज्या, सॉसेस, सूप, मांस, मासे, अंडी यामध्ये अजिनोमोटो चांगल्या रीतीने मिसळू शकतो, पण तो जास्त वापरला गेला, तर मात्र पदार्थाची चवच बिघडते असे नाही, तर खाणाऱ्याचे आरोग्यही बिघडू शकते. 
ते अधिक प्रमाणात वापरले गेल्यास जादा सोडियमवर प्रक्रिया करायला आतडय़ांना वेळ लागतो आणि टाकाऊ पदार्थ मूत्रपिंडांमार्फतच बाहेर टाकले जात असल्यामुळे मूत्रपिंडांच्या कार्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका वाढतो. अजिनोमोटो हा भाज्या मऊ करणारा एक पदार्थ आहे. थोडाफार मिठासारखा म्हणू शकतो. 
हल्लीच्या संशोधनानुसार कर्करोगास हमखास कारणीभूत ठरणारा हा पदार्थ आहे.
 अन्नाची चव आणि रंग कृत्रिमरीत्या वाढवणारा हा पदार्थ असून याने भाज्यांचा रंग खुलतो आणि त्या आकर्षक वाढतात. 
हा एक विचित्र पदार्थ आहे.
 एका व्यक्तीच्या भाजीत एक चिमुट अजिनोमोटो पुरत असेल तर दहा व्यक्तींच्या भाजीतसुद्धा एक चिमुटच पुरेशी होते. यावरून त्याच्या हानिकारक गुणधर्मांची कल्पना आपणास येईल.

अजिनोमोटो अर्थातच मोनोसोडियम ग्लुटामेटचा शोध. प्रा. किकुने इकेडा या जपानी वैज्ञानिकाने ते बनवण्याच्या पद्धतीचे पेटंट मिळवले. 
खरेतर अजिनोमोटो हे मीठ आहे. पण अजिनोमोटो हे या मीठाचे नाव नसून ते तयार करणाऱ्या अजिनोमोटो या जपानी कंपनीचेच नाव आहे.
 त्याला ‘चायनीज मीठ’ असंही म्हटलं जातं आणि ते खास करून चायनीज पदार्थांमध्ये वापरलं जातं.

साधारण ९० वर्षांपूर्वी अजिनोमोटो बाजारात आले. १९०८ मध्ये प्रा. किकुने इकेडा या जपानी वैज्ञानिकाने टोकियो विद्यापीठात त्याचा शोध लावला आणि योडोफू या पदार्थाच्या चवीचे रहस्य शोधून काढले. 
कोंबू या सागरी शैवालापासून बनवलेले ग्लुटामिक अ‍ॅसिड तशीच चव निर्माण करते असा शोध त्यांना लागला.
 त्यांनी ग्लुटामेटला युमामी असे नाव दिले. नंतर अजिनोमोटो या टोकियोच्या कंपनीने १९०९ मध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजे एमएसजीचे मार्केटिंग केले, त्याचे बाजारातील नाव अजिनोमोटो होते.
शुद्ध मोनोसोडियम ग्लुटोमेटला छान अशी चव नसते. 
त्यामध्ये दुसरा स्वाद मिसळला की त्याला चव येते आणि मग त्यामुळे एकूणच पदार्थाची चव वाढते. 
मांसाचे पदार्थ, मासे, अंडी यांचे पदार्थ, अनेक भाज्या आणि सॉस आणि सूप यांमध्ये अजिनोमोटो चांगल्या प्रकारे मिसळते. पण अजिनोमोटो जास्त घातला गेला, तर मात्र पदार्थाची चव बिघडते.
 एखाद्या पदार्थामध्ये अजिनोमोटो किती घालायचा हे त्या पदार्थाप्रमाणे ठरतं. 
अजिनोमोटो हे आरोग्यास धोकादायक आहे, हे खरे असले तरी कुठल्याही वादात दोन गट असतात.
 ग्लुटामेट हा मानवी शरीरातील चयापचय क्रियेचा भाग असतो.
 आपल्या शरीरात ते दिवसाला पन्नास ग्रॅम तयारही होत असते मग आपण वरून ग्लुटामेट म्हणजे अजिनोमोटोचा मारा करून अति तेथे माती का करतो हा प्रश्नच आहे.

खरे तर ‘मोनोसोडियम ग्लुटामेट’चा वापर कोणत्या पदार्थामध्ये करावा, त्याची ‘गुड मॅन्युफॅक्चुअरिंग लेव्हल’ काय असावी या सर्वाची अन्नसुरक्षा कायद्यामध्ये (फूड सेफ्टी अ‍ॅक्ट) तरतूद आहे. शिवाय, अजिनोमोटो वापरलेले पदार्थ १२ महिन्यांखालील मुलांना खाण्यासाठी देऊ नयेत, कारण त्यांची पचनसंस्था आणि आतडी नाजूक असतात. 
यासाठी त्याच्या पाकिटावर इशारा लिहिलेला असणे आवश्यक आहे. परंतु याचे सर्रास उल्लंघन होते.

No comments:

Post a Comment