नाही तर आपल्या शाळेची मान्यता होणार रद्द...?
विद्यार्थ्यांचे आधार अपडेट पूर्ण न करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्यासह शिक्षकांचे वेतन थांबवण्याचा इशाराही शासन निर्देशानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिला आहे.
परिणामी भर उन्हात मुलांचे आधार अपडेट करताना शिक्षकांचा घाम निघत आहे
अशातच प्रशासनाने वेतन थांबवण्याचा इशारा दिल्याने शिक्षकांचा पाराही चढला आहे.
बोगस पट संख्येला आळा घालणे शिक्षक निश्चितीसाठी करावयाची संच मान्यता शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार अपडेट करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आले आहेत.
पंधरा मे ही आधार अपडेट ची अंतिम तारीख होती त्यामुळे शिक्षकांनी धावपळ करीत काम पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे परंतु तरीही अनेक विद्यार्थ्यांचे आधार अपडेट झालेले नाही.
अशा स्थितीत शासन निर्देशानुसार शिक्षण विभागाने संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना शंभर टक्के मुलांचे आधार अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत
यात निष्काळजीपणा केला तर शाळेचे मेचे वेतन थांबवण्याचा इशारा देण्यात आला आहे स्वयं अर्थसाहित सर्व माध्यमांच्या शाळांचे 3.1 खाते मान्यता व मंडळ मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचा इशाराही देण्यात आला आहे दरम्यान आधार अपडेट साठी आता 15 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आले आहे.
दरम्यान आधार कार्ड काढणे किंवा अपडेट करणे ही पालकांची जबाबदारी आहे जिल्हा परिषद शाळेने 92% टक्के पेक्षा अधिक काम पूर्ण केले असून त्यामुळे कुठल्याही शिक्षक मुख्याध्यापकांची वेतन थांबवता येणार नाही तसेच झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल.....
राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना
लोकमत
No comments:
Post a Comment