Wednesday, 31 May 2023
अशोकाच्या पानाचे काय फायदे आहेत? त्याने कोणते आजार बरे होतात?
अशोकाच्या पानाचे काय फायदे आहेत? त्याने कोणते आजार बरे होतात?
अशोकाच्या पानांचा वापर करून तुम्ही सुरकुत्या कमी करू शकता.
वास्तविक, त्यात काही अँटी-एजिंग गुणधर्म आहेत जे चेहऱ्यावर हायड्रेशन वाढवतात.
हे टोनिंग वाढवते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.
यासाठी अशोकाची पाने उकळावी लागतात. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यात अशोकाची साल देखील घालू शकता.
आता त्यांना उकळवून ठेवा
महिलांच्या अनेक समस्यांवर अशोकाचे पान खूप फायदेशीर आहे.
ते उकळवून दळून त्याचा दशमवती बनवल्यास अनियमित मासिक पाळीवर नियंत्रण मिळते.
याशिवाय मासिक पाळी नियमित येत नसेल तर अशोकाची पाने बारीक करून त्यात साखर मिसळून दिवसातून दोनदा प्या.
हळूहळू, हे तुम्हाला तुमच्या मासिक पाळी नियमित करण्यात मदत करेल.
अशा प्रकारे तुम्ही अशोकाची पाने वापरू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते बारीक करून किंवा उकळून त्याचा अर्क ठेवू शकता आणि गरज असेल तेव्हा वापरू शकता.
Tuesday, 30 May 2023
'पानशेत पॅटर्न'राज्यभरला शिक्षण क्षेत्रातून होतोय विरोध
'पानशेत पॅटर्न'राज्यभरला शिक्षण क्षेत्रातून होतोय विरोध
शाळा मुलांच्या घरापासून दूर अंतरावर जाते तेव्हा शिक्षणही दूर जाते.
जितकी शाळा दूर जाईल तितका शंभर टक्के शिक्षणावर विपरीत परिणाम होतो या पॅटर्ननुसार एक ते दहा पटसंख्या असलेल्या शाळा बंद करणार आहेत त्याला फक्त क्लस्टर हे गोंडस नाव दिले जात आहे.
यातच शाळांमध्ये मुलांना मैदानी कमी झाली आहेत त्यांनी जर कॉमन सुविधा दाखवल्या तरच मान्यता मिळत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी शाळांची मैदानी जमिनी या खाजगीकरणात जाणार आहेत.
अशा शब्दात पानशेत पॅटर्न राज्यभर राबवण्याचा प्रस्तावावर शिक्षण क्षेत्रातून विरोध व्यक्त होत आहे शिक्षण क्षेत्रातील कार्य भाऊ चासकर म्हणाले मुलांच्या घरापासून शाळा दूर अंतरावर जाते तेव्हा शिक्षणही दूर जाते.
विशेषता मुलींचे शिक्षण थांबवण्याचे शक्यता वाढते वंचित बहुजन घटकांमधली मुले शिक्षण प्रवाहातून बाहेर जाण्याची भीती असते या विषयाकडे संवेदनशील नजरेने बघितले पाहिजे.
प्रत्येक शाळा म्हणजे एक स्वतंत्र परिसंस्था असते म्हणून याचा बायकेस स्टडी केस केला पाहिजे..
📕📕📕📕📕📕📕📕📕
हा तर खाजगीकरणाचा डाव----
आप पालक संघटनेचे मुकुंद किर्दत यांनी हा खाजगीकरणाचा डाव असल्याचा आरोप केला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मध्ये याला क्लस्टर फार्मिंग म्हटले आहे.
ज्यात इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च वाचवणे हा उद्देश आहे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी शाळा एक ते तीन किलोमीटरच्या अंतरावर हवी ती नसेल तर मुलांसाठी वाहन व्यवस्थेची तरतूद करायला हवी खाजगीकरण ग्रामीण भागात सुरू पाहत आहे. सामाजिकरण ही जमेची बाजू असली तरी त्याबाबत शंका आहे दहा गावातील मुले एकत्र करणे त्यात सामाजीकरण कशाप्रकारे ही जमेची बाजू असली तरी त्याबाबत शंका आहे
💥💥💥💥💥💥💥💥💥
हेरंब कुलकर्णी----
🟣संकल्पना चांगली प्रवासाची मात्र समस्याच- ज्येष्ठ शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी या संकल्पनेचे स्वागत केले असले तरी प्रवासाचा मुद्दा पुढे केला आहे.
यावर वाद होऊ शकतात असे ते म्हणाले जिथे पाच ते सहा मुले असतात तिथे शिक्षणाचे वातावरण असते.
साधे मुलांचे स्नेहसंमेलन घेऊ शकत नाही शिक्षकांमध्ये पण शैथील्य येते. त्यामुळे नीट शिकवले जात नाही हा पॅटर्न चांगला आहे.
फक्त प्रवासाच्या दृष्टीने अडचणीचे वाटते सरकारने छोट्या वाहनांची व्यवस्था केली पाहिजे ती झाली नाही तर मुलांची शाळा गळती होऊ शकते याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
आपलं लोकमत
नाही तर आपल्या शाळेची मान्यता होणार रद्द...?
नाही तर आपल्या शाळेची मान्यता होणार रद्द...?
विद्यार्थ्यांचे आधार अपडेट पूर्ण न करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्यासह शिक्षकांचे वेतन थांबवण्याचा इशाराही शासन निर्देशानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिला आहे.
परिणामी भर उन्हात मुलांचे आधार अपडेट करताना शिक्षकांचा घाम निघत आहे
अशातच प्रशासनाने वेतन थांबवण्याचा इशारा दिल्याने शिक्षकांचा पाराही चढला आहे.
बोगस पट संख्येला आळा घालणे शिक्षक निश्चितीसाठी करावयाची संच मान्यता शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार अपडेट करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आले आहेत.
पंधरा मे ही आधार अपडेट ची अंतिम तारीख होती त्यामुळे शिक्षकांनी धावपळ करीत काम पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे परंतु तरीही अनेक विद्यार्थ्यांचे आधार अपडेट झालेले नाही.
अशा स्थितीत शासन निर्देशानुसार शिक्षण विभागाने संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना शंभर टक्के मुलांचे आधार अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत
यात निष्काळजीपणा केला तर शाळेचे मेचे वेतन थांबवण्याचा इशारा देण्यात आला आहे स्वयं अर्थसाहित सर्व माध्यमांच्या शाळांचे 3.1 खाते मान्यता व मंडळ मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचा इशाराही देण्यात आला आहे दरम्यान आधार अपडेट साठी आता 15 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आले आहे.
दरम्यान आधार कार्ड काढणे किंवा अपडेट करणे ही पालकांची जबाबदारी आहे जिल्हा परिषद शाळेने 92% टक्के पेक्षा अधिक काम पूर्ण केले असून त्यामुळे कुठल्याही शिक्षक मुख्याध्यापकांची वेतन थांबवता येणार नाही तसेच झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल.....
राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना
लोकमत
मनाला हुरहूर लावणारी....जालियनवाला बाग लेखन-सौ.वैशाली डोंबाळे(सोलापूर)
जालियनवाला बाग...
सुवर्ण मंदिर दर्शन घेऊन पुढचा पॉईंट जालियनवाला बाग होता..
सहलीत या ठिकाणी जायचे आहे हे निश्चित झाल्यापासूनच मनाला हुरहूर लागली होती.
जो इतिहास आपण वाचला तो प्रत्यक्षात अनुभवायला बघायला मिळेल.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अनेक कथा आहेत ज्या इतिहासाच्या पानात नोंदवल्या गेल्या आहेत. आजची पिढी जेव्हा त्या घटना ऐकते तेव्हा रक्त खळखळतं तर कधी त्यांची छाती अभिमानाने फुलून येते कधी डोळ्यातून अश्रू येतात तर कधी रागाने भरून येतात..
गुलाम भारताच्या इतिहासात अशी ही एक रक्तरंजित कथा आहे ज्यामध्ये ब्रिटिशांच्या अत्याचाराची आणि भारतीयांच्या हत्याकांडाची वेदनादायक घटना आहे. जालियनवाला बाग हत्याकांड प्रत्येक भारतीयांसाठी अत्यंत वेदनादायी घटना आहे .
ज्यामध्ये रक्ताच्या नद्या वाहत होत्या आणि मृत्यूचे हे दृश्य प्रत्येकाच्या आत्म्याला दुखावत होते.
अनेक निष्पाप निरपराध लोकांनी तेथे रक्त सांडले अशा बागेकडे जाताना मनात काहूर माजले होते. अरुंद रस्ता सभोवताली असलेली बंदिस्त भिंत आजही त्यातून निष्पाप निरपराध लोकांच्या वेदनांचा भास जाणवत होता.....
व डोळे नकळत पाणवल्यावाचून राहत नव्हते... आपण ज्या स्वतंत्र भारतामध्ये बिनधास्त श्वास घेतो त्याचे खूप मोठे मोल आपल्या पूर्वजांनी दिलेले आहे याची प्रत्येक भारतीयाच्या मनात जाणीव असली पाहिजे.
इतिहासात अशा अनेक तारखा आहेत ज्यामध्ये अनेक घटनांची नोंद आहे.
परंतु 13 एप्रिल चा दिवस कोणीही भारतीय विसरू शकत नाही.
हा दिवस देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात दुःखद घटनेने नोंदवला गेला आहे. ऐतिहासिक जालियनवाला बाग हे अमृतसरच्या प्रसिद्ध सुवर्ण मंदिराजवळ स्थित एक सार्वजनिक उद्यान आहे.
हे उद्यान 6.5 एकर जमिनीवर पसरलेले असून भारतातील एक दुःखद घटनेचा साक्षीदार आहे.
ब्रिटिश राजवटीत जनरल डायरच्या आदेशानुसार या ठिकाणी बैसाखी शांततेत साजरी करण्यासाठी जमलेल्या हजारो मुले वृद्ध तरुण व महिलांवर अंदाधुंद गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले. या घटनेत हजारो निष्पाप लोकांचा बळी गेला.
अनेक महिलांनी आपल्या मुलासह आपला जीव वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली.
बाहेर पडण्याचा मार्ग अरुंद असल्याने चेंगराचेंगरीत अनेक लोक चिरडले गेले आणि हजारो लोकांना गोळ्या लागल्या.
या लोकांचे अतुलनीय धैर्य आणि बलिदान येणाऱ्या पिढींना प्रेरणा देत राहील हे नक्की..!
क्रमशः
✍️ सौ- वैशाली रवींद्र डोंबाळे
Subscribe to:
Posts (Atom)