Friday, 31 March 2023

अपहरण केलेल्या मुलाचा लागला शोध वा..रे सोलापूर पोलीस

अपहरण केलेल्या मुलाला तेलंगणातून ताब्यात घेण्यात मोहोळ पोलिसांना यश

चिंचोली काटी येथे राहणाऱ्या लहान मुला किकराया तेलंगणा येथून सायबर सेलच्या सहकार्याने शोधून काढण्यास मोहोळ पोलिसांना यश मिळाले.
शुक्रवारी दुपारी त्यास मोहोळ पोलीस ठाण्याच्या त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
 हा मुलगा 11 एप्रिल रोजी एमआयडीसी चिंचोली काठी येथून हरवला होता.
त्याचे आजोबा प्रकाश कुंची कोर यांनी याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात 11 जानेवारी रोजी पर्यंत दाखल केली होती.
त्याबाबत मोहोळ पोलीस त्यांचा सर्वत्र शोध घेऊन तपास करत होते परंतु त्याचे धागेद्वारे लागत नव्हते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक खारगे व ढावरे यांच्याकडे तपास आल्यानंतर त्यांनी चिंचोली सोलापूर पंढरपूर तुळजापूर लातूर उस्मानाबाद या ठिकाणी जाऊन संशयित लोकांकडे विचारपूस करून आरोपीवर मुलास कसून शोध घेतला.
तसेच संशयित लोकांची मोबाईल कॉल डिटेल्स ही तपासले तरीही याचा तपास लागेना.
 त्यांनी या केसचा सखोल अभ्यास करून त्यातील संशयित नंबरची सायबर सेल कडून संपूर्ण माहिती करून घेतली.
त्याचा अभ्यास केला असता त्याची लोकेशन हे तेलंगणा राज्यातील विकाराबाद या ठिकाणी असल्याचे दिसून आले पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनावरून या ठिकाणी जाऊन संशयित मोबाईल क्रमांकाच्या संपर्कात असणाऱ्या लोकांची माहिती घेत मोबाईल क्रमांकाच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेऊन सदर मुलगा व आरोपी याबाबत चौकशी केली असता मुलगा व आरोपी हे रंग रेड्डी येथील एका हॉटेलात व स्क्रॅप दुकानात काम करत असल्याची माहिती त्यांच्याकडून मिळाली मुलगा हा एमआयडीसी चिंचोली या ठिकाणी चा राहणारा असून आरोपी हा त्याच्या घराशेजारी राहण्यास होता व तो एमआयडीसी मिळेल ती मजुरी करत होता.
त्याने त्या लहान मुलास मोबाईल घेऊन देतो.
असे सांगून अडीच महिन्यापूर्वी पळवून नेले होते मुलास पळवून नेणारा किसन दुबई या सामलेटी यास पोलिसांनी अटक केली आहे.
अन....त्याने पोलिसांना मारली मिठी 
पोलिसांनी पीडित मुलास ताब्यात घेतल्यानंतर आम्ही पोलीस असल्याचे सांगून सोलापूरहून तुला नेण्यासाठी आलो आहोत असे म्हणताच
तो लहान मुलांनी पोलिसांना मिठी मारली व सर्व हकीकत रडून कथन केली.
पीडित मुलाने अनुभवलेला दोन महिन्यातील त्रास ऐकून तेथील उपस्थितीची मने हेलावून गेली.
तुझे नाव बदलायचे आहे 
संशयित आरोपी हा पीडित मुलाला धमकी देत आपल्याला मुंबईत जायचे आहे.
तुला नाव बदलायचे आहे असे वारंवार म्हणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
यावरून मुलाचे अपहरण करणाऱ्या संशयीताचा 
इतिहास व त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासणे गरजेचे आहे.

आजच्या महत्त्वाच्या बातम्या शनिवार दिनांक ०१ एप्रिल २०२३

Wednesday, 29 March 2023

बोईसर मधील बेपत्ता मुले स्वग्रही

बोईसर मधील बेपत्ता मुले स्वग्रही
84 पैकी 79 मुलांचा शोध
पोलिसांच्या कामगिरीची पालकांकडून कौतुक
बोईसर मधून गेल्या वर्षभरात 84 अल्पवयीन मुले बेपत्ता झाली होती.
 त्यामधील 79 मुलांचा बोईसर पोलिसांनी शोध लावला असून 
त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्याची कामगिरी 
पोलिसांनी केली आहे.

मुले परत आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनाही आत्यानंद झाला
 असून त्यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.
 बोईसर तारापूर हे प्रमुख औद्योगिक शहर असल्याने लाखो परप्रांतीय कामगार या ठिकाणी राहत आहेत. 
वाढत्या लोकसंख्येमुळे चोरी,घरफोडी,अपहरण,हत्या यासारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. 

अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांना गैर-धंध्यांना लावण्याच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत 
पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील उपअधीक्षक पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली 
व त्यांच्या टीमने कौशल्यपूर्ण तपास करीत
 2022-23 वर्षात अपहरण झालेल्या

 84 पैकी 79 मुला-मुलींचा शोध लावून 
त्यांना पुन्हा आपल्या कुटुंबीयांकडे सुखरूप सुपूर्त केले.
 यामध्ये दुर्दैवाने एका मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती
 तर एका मुलीवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले होते.
बोईसर तारापूर मधून आपण केलेल्या मुलांपैकी
 स्थानिक परिसरातून 3 मुले आणि 11 मुले 
पर जिल्ह्यातून 17 मुले व 45 मुली तर
 गुजरात,बिहार उत्तर प्रदेश व नगर हवेली येथून मुलांचा शोध घेतला आहे.
या सर्व गोष्टीतून पोलिसांना यश प्राप्त झाले आहे


प्रदीप कसबे वरिष्ठ पोलीस
बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ज्या मुलांचे अपहरण करण्यात आले होते 
व काही मुले घरातून काही कारणांमुळे निघून गेली होती.
त्यांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली
 विविध पदके तयार करण्यात आली आहेत.

राज्यातील इतर भागातून व परराज्यातून मुलांचे
 सुखरूप शोध घेऊन मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात येत आहे
 यातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर
 कायदेशीर कारवाई करण्याचे काम सुरू आहे.


संप काळातील कर्मचाऱ्यांचा पगार कापणार

संप काळातील कर्मचाऱ्यांचा पगार कापणार
राज्य सरकारी निम सरकारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी हे संप काळात सात दिवस गैरहजर राहिले असले तरी त्यांची सेवा खंडित येणार नाही;मात्र त्यांचा पगार कापला जाणार आहे.

या कालावधीत असाधारण रजा म्हणून धरल्याने त्यांना या दिवसांचा पगार मिळणार नाही.
संघटनांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले असून या निर्णयात बदल करण्याची मागणी केली आहे. 
कर्मचाऱ्यांनी 14 मार्च ते 20 मार्च जुन्या पेन्शन साठी संप पुकारला होता. 
या काळातील सेवा खंडित न करण्याचा निर्णय सरकारने घेतला
 ही रजा असाधारण रजा म्हणून गृहीत धरण्याचा शासन निर्णय जारी केला 
1977 साली 54 दिवसांचा विक्रमी संप केला होता.
त्यावेळी कर्मचारी अतिरिक्त काम केल्याने त्यांचा या दिवसाचा पगार कापला नव्हता.
आता पगार कापला जाणार असल्याने 
संप मागे घेताना सरकारने दिलेल्या आश्वासनात विसंगती
 असल्याचे शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीचे निमंत्रक
 विश्वास काटकर यांनी म्हटले आहे.
कर्मचाऱ्यांची शिल्लक रजा मंजूर करून सेवा नियमित करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.