शिक्षक झाले देवदूत
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोरमाळा तालुका सावली जिल्हा चंद्रपूर येथे इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कुमारी तृप्ती देविदास घोडमारे ही आदिवासी जमाती मधील विद्यार्थिनी
काही दिवस शाळेला आली नसल्याने आमचे मित्र श्री.गणेश प्रभाकर जेनेकर यांनी तिच्याविषयी चौकशी केली असता लक्षात आले की त्या मुलीचे वडील ८ दिवसापूर्वी कॅन्सरने या दुर्धर आजाराने वारले असून घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.
💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊
त्यामुळे ती शाळेला येत नसल्याचे समजले त्यांनी आपली लगेच आपल्याकडील पाच हजार रुपयाची आर्थिक मदत करून
त्या मुलीची पुढील शिक्षणाचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी उचलली असून तिची सर्व जबाबदारी घेतली आहे.
गणेश प्रभाकर जेनेकर हे नुकतेच दोन महिन्यापूर्वी आंतर जिल्हा बदलीने या शाळेत रुजू झाले आहेत.
शिक्षणाविषयी आवड,प्रत्येक मूल चांगले शिकले पाहिजे कोणताही विद्यार्थी गरिबीमुळे शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर गेला नाही पाहिजे. असा त्यांचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
या निर्णयामुळे शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक यांनी त्यांचे खूप कौतुक केले असून परिसरात त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕
निश्चितच ही बाब सर्व शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे.
व कौतुकास पात्रही आहे
यामधून समाजाने बोध घेणे
ही काळाची गरज आहे.
(नागनाथ गौरीशंकर आगाजे)
प्राथमिक विद्यामंदिर बार्शी
No comments:
Post a Comment