Tuesday, 22 August 2023

चंद्रयान ३' मोहिमेचे थेट प्रक्षेपण विद्यार्थी,प्राध्यापकांना दाखवाविद्यापीठे,महाविद्यालयांना यूजीसीचे निर्देश

'
चंद्रयान ३' मोहिमेचे थेट प्रक्षेपण विद्यार्थी, प्राध्यापकांना दाखवा
विद्यापीठे, महाविद्यालयांना यूजीसीचे निर्देश
भारताच्या 'चंद्रयान ३' मोहिमेकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. 
बुधवारचा (२३ ऑगस्ट) दिवस मोहिमेसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. त्या क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी 'चंद्रयान ३' चंद्रावर उतरतानाचे थेट प्रक्षेपण करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील महाविद्यालये आणि विद्यापीठांना केले आहेत
'चंद्रयान ३' मोहिमेंतर्गत विक्रम लँडरच्या चंद्रावरील अवतरणाची प्रक्रिया बुधवारी सायंकाळी होणार आहे. ही मोहीम देशासाठी आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ही अवतरण प्रक्रिया केले आहे.
🟣इस्रोच्या
या संकेतस्थळावर 
आणि 

🟣यूट्यूब https://youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss

🟣फेसबुक

युट्यूब वाहिनीवर दाखवली जाणार आहे.
 त्यामुळे या ऐतिहासिक क्षणांचे विद्यार्थ्यांनाही साक्षीदार होता येण्यासाठी यूजीसीने मंगळवारी परिपत्रक प्रसिद्ध करून निर्देश दिले. त्यानुसार 'चंद्रयान ३'मधील अवतरण हा देशासाठी अभिमानाचा प्रसंग आहे.
 त्यातून देशातील वैज्ञानिक आणि नवकल्पनांच्या परिसंस्थेला चालना मिळणार आहे.
 या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. . 
त्यामुळे या अवतरणाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये दाखवावे,
सायंकाळी साडेपाच ते साडेसहा 
या वेळेत विद्यार्थी आणि प्राध्यापकांना एकत्र आणून या क्षणाचे साक्षीदार व्हावे,असे यूजीसीने नमूद
चंद्रयानाच्या अवतरणाचे साक्षीदार होण्याची संधी भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) 'चंद्रयान ३' मोहिमेतील यान 
बुधवारी (२३ ऑगस्ट) चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. 
यान चंद्रावर उतरण्याच्या क्षणाचे थेट प्रक्षेपण शहरातील विज्ञान संस्थांसह ठिकठिकाणी करण्यात येणार असून, पुणेकरांना वैज्ञानिक माहिती जाणून घेतानाच चंद्रयान मोहिमेतील ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे.
लोकसत्ता

No comments:

Post a Comment