प्रयोगातून शिक्षण देण्याचा प्रयत्न
पुरस्कार मिळविणाऱ्या राज्यातील एकमेव शिक्षिका मृणाल यांची भावना------------------
🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
"प्रयोगातून विद्यार्थी घडतो.
त्यामुळेच विद्यार्थ्यांना प्रयोगातून शिक्षण देण्याचा माझा प्रयत्न असतो. आपल्याला अवगत असलेल्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना शिकविण्याचा प्रयत्न करीत आहे," अशा शब्दांत यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षिका न मृणाल गांजाळे यांनी भावना व्यक्त केली.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या पुरस्कार विजेत्यांच्या यादीत महाराष्ट्राच्या त्या एकमेव आहेत. त्यांनी डी.एड केले आहे.
याशिवाय त्या एम.ए. (इंग्लिश) आहेत.
२००९ मध्ये त्या पालघर जिल्ह्यात उपशिक्षिका म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर त्यांची पुणे जिल्ह्यात २०१७ मध्ये बदली झाली.
मंचरमधील रहिवासी असणाऱ्या मृणाल २०१८ पासून आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा,पिंपळगाव तर्फे महाळुंगे येथे शिक्षिका
म्हणून कार्यरत आहेत.
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
🟣मृणाल गांजाळे यांचे प्रयोग ....
■ व्हर्च्यूअल क्लासरूमचा वापर
■ वेगवेगळ्या देशांमधील शाळांशी संपर्क साधणे आणि शिकविण्याची पद्धत जाणून घेणे
■ राज्यातील विविध शाळांमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांचा आधार घेणे
■ विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी इंटरनेटचा प्रभावी वापर
■अभ्यासक्रमात असणाऱ्या ठिकाणांना आभासी क्षेत्र भेटी देणे
■उपक्रमशील,प्रयोगशील शिक्षकांचे समूह कार्यरत
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
त्यात पुण्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं. याच पुण्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिकेने देशभरात नावलौकिक मिळवला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून (Education Ministry) राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची (National Awards to Teachers) घोषणा करण्यात आली आहे.
त्यात पुण्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे (Mrunal Ganjale) यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील 50 शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे त्यात मृणाल या महाराष्ट्रातून एकमेव शिक्षिका आहेत.
महाराष्ट्रातून एकमेव असलेल्या शिक्षिका मृणाल या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव महाळुंगे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका आहेत. शाळेत विविध उपक्रम त्या राबवत असतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर त्या भर देत असतात. त्या तसेच 2023-24 च्या शरद पवार इंस्पायर फेलोशिप इन एज्युकेशनच्या फेलोच्या मानकरीही ठरल्या आहेत.
🟣राज्याच्या शिक्षण आयुक्तांकडून अभिनंदन........
राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी मृणाल गांजाळे यांचे अभिनंदन केले आहे. गांजाळे यांची सर्वाधिक गुणांनी निवड राज्यस्तरीय निवड समितीने केली होती आणि राष्ट्रीय पुरस्कारासाठी शिफारस केली होती. त्याबद्दल राज्यस्तरीय निवड समितीचे अध्यक्ष आणि शिक्षण आयुक्त म्हणून मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत असल्याचं मांढरे यांनी सांगितलं आहे.
🥈🥈🥈🥈🥈🥈🥈🥈🥈🥈🥈🥈🥈🥈🥈🥈
🟣 पुरस्काराची स्वरुप काय?
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतो.
राष्ट्रीय शिक्षक दिनी या पुरस्कांचे वितरण केले जाते.
यंदा मंत्रालयाकडून 50 शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून येत्या 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनमध्ये पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
प्रत्येकी 50 हजार रुपये रोख, प्रमाणपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
हा कार्यक्रम दूरदर्शन आणि शिक्षण मंत्रालयाच्या स्वयं प्रभा वाहिनीवरून थेट प्रसारित केला जाईल आणि https://webcast.gov.in/moe. वर थेट प्रसारित केला जाईल.
No comments:
Post a Comment