Monday, 7 August 2023

🇮🇳हर घर तिरंगा;१३ ते १५ ऑगस्ट या काळात 'हर घर तिरंगा' सेल्फी काढून अपलोड करता येणार फोटो..

'हर घर तिरंगा' 
अभियानासाठी डाक विभागाने कसली कंबर
स्वातंत्र्य दिनाची तयारी :-प्रत्येक पोस्ट कार्यालयातून होणार तिरंगा विक्री
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
 मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही 'हर घर तिरंगा' हे अभियान राबविले जाणार आहे.
नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध व्हावा, या उद्देशाने भारतीय डाक विभागाने त्यांच्या सर्व कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वजाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ''हर घर तिरंगा' अभियान सुरू करण्यात आले आहे. २०२२ मध्ये देशभरातील २३ कोटी घरांतील नागरिकांनी त्यांच्या घरावर प्रत्यक्ष तिरंगा फडकविला होता. 
या उपक्रमात टपाल विभागाने मोठे योगदान दिले होते. 
यावर्षीही देशभक्तीची हीच भावना समोर ठेवूनभारत सरकारने १३ ते १५ ऑगस्ट या काळात 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे.
 यासाठी भारतीय टपाल कार्यालयातून राष्ट्रध्वजांची विक्री सुरू करण्यात येणार आहे.आली आहे.
www.epostoffice.gov.in संकेतस्थळावर ई-टपाल सुविधेच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाची खरेदी करता येणार आहे.....
📸📸📸📸📸📸📸📸📸📸📸📸📸📸📸📸📸📸
🇮🇳सेल्फी काढून अपलोड करता येणार आहे फोटो...:-
राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या या कार्यक्रमाशी नागरिक जोडले जावेत, या उद्देशाने टपाल कार्यालयाने हा उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांना त्यांच्या घरावर, तसेच कार्यालयांवर फडकवलेल्या राष्ट्रध्वजासह सेल्फी फोटो
या हॅशटॅगसह समाज माध्यमांवर अपलोड करता येईल.

⭕तिरंग्यासाठी जवळच्या पोस्टात संपर्क साधा:-
हर घर तिरंगा २.० अंतर्गत पोस्ट विभाग भारताचा राष्ट्रध्वज पुरवत आहे. 
राष्ट्रध्वजाचा आकार २० इंच x ३० इंच (ध्वज खांबाशिवाय) आहे. 
हा ध्वज आपण आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिसमधून २५ रुपयांत प्राप्त करू शकता.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
राष्ट्रध्वज फडकवण्याचे 'हे' आहेत १० नियम:-
⭕१. तिरंगा ध्वज हा लोकर, सूत, सिल्क किंवा खादीपासून तयार केलेला असावा.
 झेंडा आयताकार असायला हवा. लांबी आणि रुंदीचे प्रमाण ३:२ असे असावे. 
केशरी रंग खालील बाजूस ठेवून झेंडा फडकवू नये.

⭕२. सूर्योदयापासून ते सूर्यास्तादरम्यान तिरंगा फडकविता येतो. 
तिरंगा कधीही जमिनीवर ठेवता येत नाही. 
झेंडा अर्ध्यावर ठेवून फडकवू नये. काही प्रसंगी सरकारी आदेश असल्याशिवाय सरकारी इमारतीवरील तिरंगा अर्ध्यावर आणण्यास मनाई आहे.

⭕३. तिरंगा कधीही पाण्यात बुडवू नये. 
झेंड्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान करू नये. 
तिरंग्याचा कोणताही भाग जळालेला असल्यास तसेच तिरंग्याबद्दल अवमानकारक टिपण्णी केल्यास तीन वर्षांचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

⭕४. तिरंग्याचा व्यावसायिक वापर करू नये. 
तिरंग्याचा गैरवापर कुणी करत असेल, तिरंगा वस्त्र म्हणून वापरत असेल किंवा मृतदेहाभोवती तिरंगा लपेटत असेल तर (शहीद जवान वगळून) तो तिरंग्याचा अपमान समजला जातो.

⭕५. तिरंग्याचा गणवेश म्हणून वापर करू नये. जर एखादी व्यक्ती कमरेच्या खालीली वस्त्रासाठी तिरंग्याचा कापड म्हणून वापर करत असेल तर तो तिरंग्याचा अपमान आहे.
 तिरंग्याचा रुमाल किंवा उशीसाठीही वापर करता येणार नाही.

⭕६. तिरंग्यावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहू नयेत. 
विशेष प्रसंगी किंवा राष्ट्रीय दिन जसे प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाला तिरंगा फडकविण्यापूर्वी त्यात फुलांच्या पाकळ्या ठेवण्यास हरकत नाही.

⭕७. एखाद्या कार्यक्रमात व्यासपीठावरील टेबल झाकण्यासाठी किंवा मंचाची सजावट करण्यासाठी तिरंग्याचा वापर करू नये. 
गाडी, रेल्वे किंवा विमानाचे छत वा अन्य भाग झाकण्यासाठी तिरंग्याचा वापर करता येणार नाही.
 एखाद्या इमारतीत तिरंग्याचा पडदा लावण्यासही सक्त मनाई आहे.

⭕८. फडकविलेला तिरंगा त्याच स्थितीत कायम राहायला हवा. फाटलेला, मळलेला वा चुरगळलेला तिरंगा फडकवू नये. 
त्यावर योग्य पद्धतीने पुढील सोपस्कार करावे.

⭕९. तिरंगा एखाद्या मंचावर फडकवला असल्यास, वक्ता भाषण करत असताना तिरंगा त्याच्या उजवीकडे असणे आवश्यक आहे.

⭕१०. अन्य झेंडा किंवा पताका राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा त्याच्यावर किंवा त्याच्याबरोबर लावू नये.
लोकमत

No comments:

Post a Comment