Wednesday, 30 August 2023

हरवलेल्या बाळाला शोधण्यासाठी अंत्ययात्राही तासभर थांबली... मशिदीच्या भोंग्यावरून देण्यात आली सूचना

हरवलेल्या बाळाला शोधण्यासाठी अंत्ययात्राही तासभर थांबली... मशिदीच्या भोंग्यावरून देण्यात आली सूचना

कासोदा एका वृद्धेची अंत्ययात्रा सोमवारी संध्याकाळी ४ वाजेदरम्यान निघणार होती.
 या गर्दीत तीन-चार वर्षांचा बालक अचानक हरवला,शोधाशोध सुरू झाली... 
नातेवाईक या बाळाचा शोध गावभर फिरू लागले.
मशिदीच्या भोंग्यावरून देखील माहिती देण्यात आली. 
तासाभराच्या धावपळीनंतर हा बाळ सापडला आणि जिवाचा आकांत करणारी आई व उपस्थितांनी निःश्वास सोडला.

निवृत्त पोस्टमन वसंतराव सोनार यांच्या पत्नी इंदूबाई सोनार (६७) यांचे २८ ऑगस्ट रोजी निधन झाले. नातेवाईक सर्वांना निरोप गेले, अंत्ययात्रेसाठी वेळ संध्याकाळी ४
वाजेची ठरविण्यात आली. 
सर्वच नातेवाईक वेळेआधी जमले.
वसंतरावांची पुतणी दीपाली ही जळगावहून चार वर्षांच्या बाळासोबत आली होती. 
जमलेल्या गर्दीत तिचे बाळ अचानक तेथून निघून गेले. 
पाच सात - मिनिटांनी बाळ दिसत नव्हते. 
आई कावरीबावरी झाली. 
या बाळाची 
या दुःखात जमलेल्या सर्वांपर्यंत पोहोचली आणि सर्वत्र शोधाशोध सुरू झाली.

रस्ता मिळेल तिकडे गल्लीबोळांत दुचाकी व पायी सर्वच लोक या बाळाचा शोध घेऊ लागले. 
आईचा आकांत हृदय पिळवटून टाकत होता. अर्ध्या पाऊण तासानंतर हे बाळ बाजारपट्ट्यानजीक मंदिराजवळ आढळून आले. 
एका महिलेने त्याला सुखरूप सांभाळले होते. 
बाळाला व्यवस्थित बोलता येत नसल्याने ते पत्ता सांगू शकत नव्हते की आई-वडिलांचे नाव सांगू शकत नव्हते.
 त्यामुळे त्याला शोधण्यात खूप अडचणी आल्या.
 एक तर म्हातारी मेल्याचे दुःख व त्यात बाळ हरविल्याची घटना यामुळे ही अंत्ययात्रा चर्चेचा विषय ठरली.
माणुसकीचे दर्शन-ज्या वेळेस मूल मिळत नव्हते.
 त्यावेळेस मुस्लिम बांधवांनी नमाज पठण साठी वापरल्या जाणाऱ्या भोंग्याचा त्यावेळेस वापर केल्याने गावातील सर्व लोकांना लहान बाळची हरवल्याची सूचना देण्यात आली..

लोकमत
कसोदा 
प्रमोद पाटील

No comments:

Post a Comment