शिक्षक संघटना झाली आक्रमक
शिक्षकांचे बीएलओ आदेश रद्द करा.
खाजगी प्राथमिक शाळा कृती समितीची मागणी
सोलापूर:- खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षकांना दिलेले बीएलओचे आदेश रद्द करा.
अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व निवडणुक निर्णय अधिकारी यांना दिल्याची माहीती डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव सुनिल चव्हाण यांनी दिली.
डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, युवक शिक्षक कर्मचारी संघटना व अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.
या शिष्टमंडळात आप्पासाहेब पाटील, आप्पाराव इटेकर, विनोद आगलावे, अ. गफुर अरब, अनिल गायकवाड आदी होते.
निवडणुकीच्या संदर्भाने मतदार याद्यांच्या विविध कामासाठी शिक्षकांना बीएलओचे ( मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) आदेश खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना देण्यात आले आहेत.
जे शिक्षक बीएलओच्या कामासाठी नकार देतील त्यांच्यावर एफआरआय दाखल करण्यात येइल असे प्रशासनाच्यावतीने कळविले होते.
मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना बीएलओचे काम करण्याची जबरदस्ती करण्यात येऊ नये.
जे शिक्षक स्वेच्छेने ड्युटी करण्यास तयार आहेत, त्यांनाच ड्युटी द्यावी. असे मा. उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही शिक्षकांना जबरदस्तीने बीएलओ म्हंटले आहे.
ड्युटी करण्यासाठी एफअर आय दाखल करण्याची भिती दाखवली जात आहे.
खाजगी प्राथमिक शाळांसमोर अनेक समस्या आहेत.
विविध प्रयत्न करुन शाळेत विद्यार्थ्यांना दाखल करण्यात येते. बीएलओच्या ड्युटीमुळे शिक्षकांना अनेकदा शाळा सोडुन संबंधित प्रभागात फिरावे लागते.
त्याचा परिणाम शाळेच्या पटसंख्येवर व गुणवत्तेवर होतो. याबाबतीत पालक वर्गामधेही नाराजीचा सुर आहे.
शिक्षकांना बीएलओचे आदेश जबरदस्तीने देऊ नयेत व रुजु न होर्णाया शिक्षकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करु नये अन्यथा संघटनेच्यावतीने उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल असे संघटनेच्या पत्रकात म्हटले आहे..
No comments:
Post a Comment