राज्यातील क्रीडा गुणवत्तेचा
गौरव करताना देण्यात येणाऱ्या श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराबाबत कायमच होणारे वाद लक्षात घेता पुढील वर्षी म्हणजे २०२३-२०२४ पासून पुरस्काराच्या नियमावलीत सुसूत्रता आणि एकवाक्यता आणण्याच्या प्रयत्न केला जाईल,अशी ग्वाही राज्याचे क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, थकीत तीन वर्षांच्या पुरस्कार वितरणात हषीकेश अरणकल्ले, महेश ठाकरे आणि अभिजीत गुरव या तीन खेळाडूंचा नव्याने समावेश करण्यात आला.
त्याच वेळी यापूर्वी जाहीर झालेल्या मिताली वाणी यांचा पुरस्कार स्थगित करण्यात आला आहे.
तीन वर्षांचे थकीत पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काही खेळाडूंनी अन्याय झाल्याचे सांगत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
उच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करताना खेळाडूंचे म्हणणे ऐकून घेण्याचे आदेश दिले होते.
खेळाडूंचे म्हणणे ऐकून घेत राज्य क्रीडा प्रशासनाने त्यामधील मल्लखांबपटू हृषीकेश अरणकल्लेया एकाच खेळाडूची विनंती मान्य करून त्याला २०२०-२१ साठी पुरस्कार जाहीर केला. विराज लांडगे, विराज परदेशी, कल्याणी जोशी या खेळाडूंची विनंती अमान्य करण्यात आली.
वाद आणि खेळांचा दर्जा हा चर्चेचा व्यक्त केला.
सर्वकष अभ्यास करून नव्या वर्षात पुरस्कार नियमावलीत बदल केले जातील.
पुरस्कारासाठी खेळाडूंनी न्यायालयात जाणे हे दुर्दैवी असून,भविष्यात अशी वेळ पुन्हा येणार नाही यासाठी नियमावली परिपूर्ण केली जाईल,"
असा विश्वासही दिवसे यांनी
व्यक्त केला...
⚽🏀🏈⚾🥎🎾🏐🏉🥏🎱🪀🏓🏸🏑
🟣चर्चेत आलेले अन्य मुद्दे----
• महाराष्ट्र सरकार जर्मनीतील बुडेसलिगा सोबत करार करणार
• या करारानुसार बुडेसलिगाच्या सहकार्याने राज्यात १४ वर्षाखालील लीग सुरू करण्याचा मानस
फुटबॉलपटू आणि प्रशिक्षकांचे आदानप्रदान शक्य
• क्रीडा गुणवत्तेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न
• जगज्जेती तिरंदाज आदिती स्वामीचा यथोचित गौरव करणार
• आठ हजार खेळाडूंच्या सर्व माहितीचे एकत्रीकरण
• खेळाडूसाठी शासकीय सेवेतील रिक्त पदे भरणार
🟣वुशू खेळाच्या पुरस्काराचा वाद चौकशी समितीसमोर-----
वुशू या खेळातील क्रीडा उपप्रकारावरून वेगवेगळे मतप्रवाह समोर आले आहेत. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून या पुरस्काराचा वाद क्रीडा पुरस्कार समितीसमोर ठेवण्यात आला आहे. या समितीच्या अहवालानंतर या संदर्भात निर्णय घेण्यात येईल.
त्यामुळे न्यायालयात गेलेल्या कल्याणी जोशी यांचीही विनंती क्रीडा मंत्रालयाने फेटाळली असून,याच निकषाला धरून यापूर्वी जाहीर झालेल्या मिताली वाणी यांचा पुरस्कारही स्थगित करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment