तीन वर्षांपासून शिक्षक पुरस्कार वेटिंगवर; आता पुन्हा नवा प्रस्ताव कशासाठी द्यावा?
शिक्षकांचा सवाल : वरिष्ठ श्रेणी प्रस्तावाचाही विसर
मागील तीन वर्षापासून आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण झाले नाही.
या परिस्थितीत पुन्हा नव्याने प्रस्ताव मागविण्याचे कारण काय ? हा प्रश्न शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव मार्च २०२१ पासून मंजूरीविना पडून
आहेत.
आपल्या सलग सेवेची १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना डॉ. चटोपाध्याय समितीच्या शिफारशीनुसारहा लाभ मिळतो.
सोलापूर जिल्ह्यातील अशा लाभार्थी शिक्षकांचे प्रस्ताव मंजूर झाले नाहीत लाभार्थी शिक्षकांची संख्या१२० च्या जवळपास आहे.
एवढ्या कमी संख्येने असणारे प्रस्ताव मंजूर होण्यासाठी तीन-तीन वर्षे वाट बघावी लागत असल्याची खंत शिक्षकांनी व्यक्त केली.
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
⭕प्रस्ताव पुन्हा द्यावा का?
अगोदरच्याच शिक्षकांच्या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम घेतला नाही तर नवीन प्रस्ताव कशासाठी?
ज्या शिक्षकांनी अगोदर प्रस्ताव दिले आहेत त्यांनी पुन्हा प्रस्ताव द्यायचे का?
असे प्रश्न सध्या शिक्षकांना पडले आहेत.
वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर होणे ही रुटीन प्रोसेस आहे. त्यालाही तीन वर्षे कालावधी लागतो ही शोकांतिका आहे.
मागील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम घ्या,
पुरस्कार कोणाला मिळाला जाहीर करा,
मगच पुढील पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवा.
- राम शिंदे, जिल्हाध्यक्ष, सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन संघटना
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
लोकमत
No comments:
Post a Comment