सावधान!
😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎
वेगाने पसरतोय आय फ्लू
आरोग्य प्रशासन सतर्क;लोकांना काळजी घेण्याचे आवाहन.........
डोळे येण्याची साथ (आय फ्लू) आता वेगाने वाढत चालली असून, पुणे विभागात सर्वत्र रुग्ण आढळले आहेत. वातावरणातील अनिश्चित बदलांमुळे साथीचे रोग पसरत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे डोळे येणे. राज्यभरात सध्या डोळ्यांची साथ पसरली आहे.लहान मुलांना डोळे येण्याचे प्रमाण अधिक आहे. यावर्षी डोळ्यांचा संसर्ग सौम्य स्वरुपाचा दिसत असला तरी संसर्ग मात्र मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान, घाबरुन न जाता योग्य ती काळजी घ्या. गरज असल्यास डॉक्टरांकडे जा, अशा सूचना आरोग्य विभागाकडून करण्यात
आल्या आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरसह पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात डोळ्यांची साथ जोमाने वाढत आहे.
डोळे येण्याचा आजार हा औषधांशिवाय बरा होऊ शकतो.डोळे येण्याचा आजार
हा संसर्गजन्य आहे, सध्या तो सर्वत्र पसरत आहे.
सर्वांनी काळजी तात्काळ डॉक्टरांना लवकरच त्यावर नियंत्रण मिळेल.
👁️👁️👁️👁️👁️👁️👁️👁️👁️👁️👁️👁️👁️👁️👁️👁️👁️👁️
डोळे येण्याची लक्षणे:-
⭕डोळे लाल होणे आणि पिवळसर द्रव डोळ्यातून येणे
⭕पापण्या एकमेकांना चिकटणे
⭕ असामान्यपणे डोळ्यांतून जास्त अश्रू येणे | डोळ्यांतून पाण्यासारखा किंवा घट्ट स्राव येणे
⭕डोळ्यात किरकिरी जाणवणे
⭕डोळ्यांना सूज येणे
⭕दोन्ही डोळ्यांना एकदम सूज येणे
⭕डोळ्यातून सतत पाणी येत राहणे
👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀
अशी घ्या काळजी:-
■ डोळे किंवा चेहऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी आणि नंतर हात धुवून घ्या.
■ टेबलाचा पृष्ठभाग आणि दरवाजाचे हॅन्डल यांसारख्या सार्वजनिक वापराच्या वस्तूंना कमीत कमी स्पर्श करा.
■ तुमचे डोळे लालसर आहेत तोपर्यंत शाळेत किंवा कामावर जाणे टाळा.
◼️दिवसातून हात पाच वेळा स्वच्छ धुवा.
◼️डोळे पाण्याने स्वच्छ करा. मेडिकलमध्ये जाऊन स्टेरॉईड डोळ्यांमध्ये सोडले तर धोका संभवू शकतो.
◼️डोळे आलेल्या रुग्णांपासून दूर राहा.
■ दुसऱ्यांचे टॉवेल, उशी आणि बेडशीट यांसारख्या वस्तू वापरणे टाळा.
◼️डोळे चोळू नयेत. डोळे स्वच्छ थंड पाण्याने धुवावेत.त्रास सुरू झाल्यास दाखवावे.
डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.
वाढत चाललेला हा
आजार रोखण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सर्वतोपरी
प्रयत्न केले जात आहेत..
🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬
No comments:
Post a Comment