Wednesday, 30 August 2023

पालकांची वाढली चिंता; मोबाइल घेतल्यावर उचलतात टोकाचे पाऊल पोरांना रागवायचं नाही का?

किशोरवयीन वय हे इतकं
अल्लड असतं की, चांगलं नि वाईट काय? हे समजण्याची त्यांची बौद्धिक कुवतच नसते.
 अशा वयात मुलांच्या हातात मोबाइल पडल्याने माहितीचे महाजालच जणू मुला-मुलींसाठी खुले झाले आहे; मात्र त्याचा अतिरेकी वापर अल्पवयीन मुला-मुलींना मोबाइलचे जडलेले व्यसन ही आता पालकांसाठी डोकेदुखी बनली आहे.

मोबाइलमुळे मुलांचे स्वतःचे एक विश्व तयार झाले आहे, त्यातून बाहेर काढण्यासाठी पालकांनी कठोर पावले उचलण्याचा प्रयत्न केला, तर घरातून निघून जाण्याची किंवा आत्महत्या करण्याची धमकी देणे 
किंवा आदळआपट करून राग व्यक्त आईने मुलाला कोणतेही काम करणे असे प्रकार घडत असल्याने मुला-मुलींचे मोबाइल व्यसन सोडवायचे कसे? अशी चिंता पालकांना भेडसावू लागली आहे.
मुले-मुली वयात आल्यानंतर त्यांच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक बरेच बदल घडत असतात. नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची त्यांच्यात उत्सुकता निर्माण झालेली असते; पण त्यांच्यातील बदलांचे निरीक्षण करीत पालक नव्हे, तर एका

मित्रत्वाच्या भूमिकेतून त्यांच्याशी संवाद साधण्याची प्रक्रिया पालकांच्या स्तरावर सुरू होते; मात्र मोबाइलमुळे पालक आणि मुलांमध्ये विसंवादाची एक दरी निर्माण झाल्यासारखे झाले आहे.

आईने मुलांना कोणतेही काम
सांगितले, तरी मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसलेला मुलगा काम करण्यास टाळाटाळ करतो. त्याची अचानक चिडचिड सुरू होते. आई पुढे काही बोलली की, तो घरातून राग डोक्यात घालून बाहेर पडतो, असे चित्र बहुतांश घरांमध्ये पाहायला मिळत आहे. पाल्यांचा वाढता चिडचिडेपणा, एकटेपणा, विसंवाद या दुष्परिणांमुळे मुला-मुलींशी वागायच कसं? या कात्रीत पालक सापडले आहेत.
🟣प्रसंग १ : दोन दिवसांपूर्वी
मुलीच्या हातातून मोबाइल काढून घेतला म्हणून १३ वर्षांची मुलगी घर सोडून निघून गेली. पालकांनी सगळीकडे शोधले शेवटी ती रेल्वेस्टेशनच्या बसस्थानकावर बसलेली सापडली.

🟣प्रसंग २: मुलगा अभ्यास करण्याचे सोडून सतत व्हिडीओ गेमच्या आहारी गेल्याचे दिसल्यानंतर पालकांनी त्याच्या मोबाइलला लॉक लावले. त्याचा राग आल्याने मुलाने मोबाइल सहाव्या मजल्यावरून खाली फेकून दिला.
लहान मुलांचे वयोगटाप्रमाणे समस्या वेगळ्या आहेत. चौथीपर्यंतच्या मुलांना लहान लहान म्हणत असतो आणि तेच पाचवी ते दहावीच्या
मुलांना एकदम आता तू मोठा झालास असे म्हटले जाते. ते मुलांना स्वी येत नाही. 
सध्या कुटुंबांमध्ये सिंगल चाइल्डचे प्रमाण अधिक आहे. त्यांना हव्या त्या गोष्टी आणून दिल्या जातात. त्यामुळे नकार पचवणे त्यांना अवघड जाते; पण मैदानी खेळच बंद झाले. 
घरात मुलांनी उपद्व्याप करू नये, त्यासाठी मुलांना आपणहून हातात मोबाइल दिले जातात किंवा टीव्हीसमोर बसविले जाते.
 पालकांकडूनच या सवयी मुलांना लावल्या जातात, मग ते व्यसन बनल्यानंतर पालकांना चुकांची जाणीव होते.
- अरुंधती खाडिलकर, मानसोपचारतज्ज्ञ
लोकमत

No comments:

Post a Comment