देशाचे सरंक्षण करणारे सैनिक विविध सण-उत्सव आपल्या कुटुंबियांसोबत साजरे करू शकत नाहीत.
भाऊ,बहिणीच्या पवित्र नात्यातील रक्षाबंधनातही बहीण आपल्या भावाला राखी बांधू शकत नाही,
अशा अनेक सैनिक भावांसाठी
‘धागा शौर्याचा आणि अभिमानाचा अभियान’
अंतर्गत प्राथमिक विद्यामंदिर बार्शी येथील
विद्यार्थिनिंनी आपल्या हाताने बनवलेल्या राख्या सीमेवरील सैनिकांना पाठवल्या.
रक्षाबंधन उत्सव हा संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा होतो,
मात्र भारत मातेचे रक्षण करणाऱ्या देशाचे सैनिक सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना आपल्या कुटुंबासोबत उत्सवात सहभागी होता येत नाही.
परंतु,सीमेवरील सैनिकांना आपल्या बहिणीच्या प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी बार्शी येथील सर्व शिक्षकांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही
‘धागा शौर्य का राखी अभियान’
अंतर्गत पालक व विद्यार्थिनींना राख्या तयार करण्यासाठी आवाहन केले होते.
याला प्रतिसाद देत शाळेतील सर्व पालकांनी व विद्यार्थिनींनी खूप सुंदर व मनमोहक असे राखी तयार केले होते.
बुधवारी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या
व शुभेच्छा पत्र पोस्टाद्वारे पाठविण्यात आले आहेत.
देशबांधवांच्या संरक्षणाचे भान,
कर्तव्याशी बांधील राहून सैनिक सीमेवर तैनात असतात.
विद्यार्थीनींनी पाठवलेल्या एका राखीने सैनिकांचे आत्मबल वाढेल.
रक्षाबंधनाच्या धाग्यातून सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्याची संधी या उपक्रमातून आमच्या सर्व विद्यार्थ्यांनाही मिळेल,असे संस्थेचे सचिव माननीय *श्री.महादेव बुचडे सर* म्हणाले.
सैनिक युद्धांसह नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीतही देशवासीयांना मदत करतात.
त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम घेतला.
विद्यार्थ्यांनी स्वतः राखी तयार केल्याने त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळाला.
शिवाय मुलांच्या सृजनशीलतेला चालना मिळाली. त्याचबरोबर देशभक्ती या राष्ट्रीय मूल्याचीही जोपासना झाली,
असे *मुख्याध्यापक योगिता बेळे* यांनी सांगितले.
राख्या तयार करण्यासाठी सर्व शिक्षक यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
पालकांनी यासाठी सहकार्य केले.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
राखी मिळाल्यावर कमांडर वाघा बॉर्डर यांनी मानले सर्व मुलींचे आभार;येण्याचे दिले वचनही--------
वाघा बॉर्डर वरील कमांडर यांना शनिवार दि.19 ऑगस्ट रोजी पाठविलेले बंद पाकीट मिळाले असून ते पाहून खूप भारावून गेले.
ते सुद्धा आमच्या सोबत मराठी बोलले आमच्या मुलींचा त्यांना येण्याचा आग्रह सांगितला तेव्हा ते आमचे एका प्रतिनिधी यांना पाठवू असे सांगितले आमचे राखी ते सैनिक बांधतील या विचाराने खूप आनंदी झाले होते पण गोड कसे देणार?? या विचाराने शांत होते. सैनिक बांधव येतील या समजुतीवर विद्यार्थी शांत झाले.
सहशिक्षक
श्री.राहुल दत्तात्रय म्हमाणे
प्राथमिक विद्या मंदिर बार्शी
No comments:
Post a Comment