Friday, 4 August 2023

शिक्षकांना मुख्यालयाचीअट शिथिल होणार...!

शिक्षकांना मुख्यालयाची
अट शिथिल होणार
मुख्यमंत्र्यांचे शिक्षक संघाला आश्वासन
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
राज्यातील शिक्षकांना शाळेच्या ठिकाणी राहण्याची अट काही प्रमाणात शिथिल करण्यात येणार आहे.
 तसेच एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी २०२१ पर्यंतची मुदतवाढ देण्यासंदर्भात काही दिवसात शासन निर्णय निर्गमित करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत दिले आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्त्वात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली. बैठकीत भंडारा जिल्हातर्फे जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद उपस्थित होते.
बैठकीमध्ये सैय्यद यांनी सन २०१४ मध्ये विषय शिक्षक म्हणून पदोन्नती दिलेल्या शिक्षकांना वेतनश्रेणीचा व सेवानिवृत्त शिक्षकांची संपूर्ण देय रक्कम तत्काळ प्रदान करण्याचा विषय मांडला.

शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षकांमधून भरण्यात यावीत, सर्व शिक्षकांना परीक्षेसाठी संधी मिळावी आणि केंद्रप्रमुख परीक्षेसाठी ५० वर्षे वयाची व ५० टक्के गुणाची अट शिथिल करावी, शिक्षकांचे पगार महिन्याच्या एक तारखेलाच करणे, प्राथमिक शिक्षकांना १०, २०, ३० ची आश्वासित प्रगती योजना लवकर लागू करणे,शिक्षकांना वैद्यकीय उपचारासाठी कॅशलेस सुविधा लवकर उपलब्ध करून देणे,उच्च शैक्षणिक अर्हताधारक पीएच. डी., सेट, नेट व इतर उच्च शिक्षित शिक्षकांना पदोन्नती देणे, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आणि सरळ सेवेत पात्र होण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा सेवा प्रवेश नियमाच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात यावी.
 केंद्रप्रमुखांची शंभर टक्के पदे शिक्षकांमधूनच भरण्यात यावी.
नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना एनपीएस पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे,आंतर जिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली पूर्ववत चालू ठेवणे,अनफिट फॉर लेडीज क्षेत्र गृहीत धरणे. अशा मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
लोकमत भंडारा

No comments:

Post a Comment