Saturday, 24 June 2023

घोटाळा करून पास झालेल्या ७६ गुरुजींची होणार 'सुट्टी !

परीक्षा परिषदेच्या आयुक्तांचे पत्र : टीईटीचे प्रमाणपत्र ठरवले अवैध
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
 शिक्षकांचा टीईटी प्रमाणपत्र---
घोटाळा उघड झाल्यानंतर पुणे येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. 
या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान गैरप्रकार करून उत्तीर्ण झाल्याचे निष्पन्न झाल्याने बीड जिल्ह्यातील शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ मधील १, तर परीक्षा २०१९ मधील ७५, अशा एकूण ७६ गुरुजींची संपादणूक रद्द करण्यात आली असून, त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. 
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले आहे.
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
शिक्षकांचा टीईटी प्रमाणपत्र-----------
घोटाळा उघड झाल्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला २०१३ ते २०१९ या कालावधीतील सर्व प्रमाणपत्र जमा करण्यास सांगितले होते. 
त्यानुसार जिल्ह्यात २०१३ नंतर लागलेल्या शिक्षकांकडील टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी शिक्षण विभागाने मागविले होते. 
बीड जिल्ह्यात ११५ प्राथमिक व ३५ माध्यमिक शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र संबंधित शाळांनी सादर केले होते. ते राज्य परीक्षा परिषदेकडे पडताळणीसाठी पाठविले होते.
याचदरम्यान, टीईटी घोटाळ्यात अपात्र ठरविलेल्या शिक्षकांचे शालार्थ आयडी गोठवून वेतन बंद करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले होते. 
प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या वेतन अधीक्षक व भविष्य निर्वाह निधी पथकाने सादर केलेल्या यादीतील
शिक्षकांनी धारण केलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैयक्तिक पात्रता प्रमाणपत्र जानेवारी २०१९ मध्ये मान्यता रद्द करण्याआधी झालेल्या टीईटी परीक्षेतील शिक्षकांची सहायक संचालक गैरव्यवहारातून प्राप्त केल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालकांसमोर निदर्शनास आले. 
त्यामुळे शासनाच्या सुनावणी झाली होती. अखेर निर्णयातील तरतुदीनुसार शिक्षक, रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या
आयुक्त शैलजा दराडे यांनी बीड या जिल्ह्यातील ७६ शिक्षकांची यादी तथा पाठवून त्यांची संपादणूक रद्द करण्यात आली असून, त्यांचे महाराष्ट्र २० जून शिक्षक पात्रता परीक्षेतील प्रमाणपत्र अवैध असल्याचे नमूद केले आहे.
📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕
२०१८ च्या परीक्षेतही...
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ मधील गैरप्रकाराच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यांच्या तपासादरम्यान उमेदवारांनी गैरप्रकार करून शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ उत्तीर्ण झाल्याचे निष्पन्न झाले.
■ या अनुषंगाने गैरप्रकारात समाविष्ट उमेदवारांविरुद्ध शास्ती निश्चित करून त्यांची महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ मधील संपादणूक रद्द करण्यात आली.
■ यात बीड जिल्ह्यातील एका उमेदवाराचा समावेश असून, त्याचे २०१८ चे प्रमाणपत्र अवैध असल्याचे परीक्षा परिषदेच्या आयुक्तांच्या पत्रात नमूद आहे.
🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️
यांचे शिक्षक पात्रता प्रमाणपत्र रद्द प्रतीक्षा वाघ, रमाबाई जाधव, कौस्तुभ शिंदे, शिल्पा गित्ते, उज्मा फातेमा फारूक बेग, अर्शद राशीद सय्यद, हुमेरा बानूआझम हुसेन शेख, हुस्ना यास्मिन शेख हमीद, पूजा मस्के, संतोष आडे, पूजा कांबळे, परमेश्वर राठोड, सीमा रुद्रे, अजय जाधव, परहा यास्मिन जहिरोद्दीन, फौजिया नुरुलहसन लाहोरी, अतियाबेगम शेख मुस्तफा, आस्मा सय्यद मोहम्मद सिद्दीकी, सोबिया फरहा कादरी सय्यद जमिरोद्दीन कादरी, बीबी हजेरा शेख साजेद असफिया परवीन मोहम्मद अब्दुल बासेत, निशात आरजुमंद इजहार मझरोद्दीन, शामिका रंजवण, मीना टिके, ऊर्मिला वाडे, मुक्ताबाई सोगे, प्रशांत कुलकर्णी, अमोल पाटोळे, द्रौपदी सानप, सविता घाडगे, सुनीता देवकते, वर्षाराणी निरडे, मुजाहिद खलील, अब्दुल हमीद मोमीन, युसूफ शेख, मो. शेख, शाझिया बेगम मो. अब्दुल सत्तार, यास्मिन बेगम स. अब्दुल कादर, उम्मेसायमा वहाजोद्दीन अन्सारी, गणेश वारकळे, ज्योती काळे, झिशान हमीद शेख, यास्मिन बेगम झिया अहमद सिद्दीकी, मोहम्मद खान, चांदरखान पठाण, शहनाझ बेगम नजीर शेख, कौसर नवाजखान पठाण, सविता पवार, प्रणिता कुलकर्णी, निलोफर काझी, अदनान अहमद अनिस खान पठाण, फैजोद्दीन रिझवानोद्दीन शेख, अलिया बेगम शषख सलीम, मुद्दसीर मेहराज शेख, शाहीन बेगम बशीरोद्दीन काझी, मुदस्सीर मेहराज शेख, अन्वरी बेगम मुख्तार अहमद सय्यद, शाझियातस्किन मोहम्मद मुनिसोद्दीन सिद्दीकी, सय्यद फरहीन बेगम रहिमोद्दीन खान कोसर बेगम शकीलखान, सलाम मुख्तार अब्दुल, इरफान गमील दायमी सईद, मो. मोडनोद्दीन मो. मोडजोद्दीन सिद्दीकी, अकेबअली अमानत अली सय्यद, आदिल आयुब सय्यद, शैलेश कसबे, कावेरी सानप, आयशा ताजिन फारूख शेख, सुहासिनी घोबाळे, विकास लोंढे, विश्वास काळे, उज्मा समितान खिजरून कादरी, सुप्रिया नराळे.
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
२०१९ च्या परीक्षेतील ७५ प्रमाणपत्र अवैध-------------
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ मधील गैरप्रकाराच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यांच्या तपासादरम्यान उमेदवारांनी गैरप्रकार करून शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ उत्तीर्ण झाल्याचे निष्पन्न झाले. यातील ७५ उमेदवारांची संपादणूक रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ मधील प्रमाणपत्र अवैध असल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.
लोकमत------

No comments:

Post a Comment