🟣पालकांसाठी दुय्यम ठरणारे काही मुद्दे...
→ शाळेत शिकवणारे शिक्षक कसे आहे? शिकवणारे शिक्षक किती चांगले प्रशिक्षीत आहे?
→ विद्यार्थी मानसशास्त्र शिक्षकांना किती माहीत आहे? शाळेत प्रत्यक्ष कृतिशील शिक्षण पद्धती आहे। का?
प्रत्येक मूल हे एकमेव अद्वितीय असते आणि त्याची शिकण्याची पद्धत आणि गती वेगवेगळी असते हे जाणून मुलांना शिकण्याची संधी शाळा उपलब्ध करून देते का ?
या विषयी गांभीर्य अजिबात नसते आणि शाळा निवडली जाते. विद्यार्थ्याचा शाळेत प्रवेश होत नसेल तर फी व्यतिरिक्त डोनेशन देऊन देखील प्रवेश घेतला जातो.... पालकांसाठी शाळा ही एक एखादं प्रॉडक्ट तयार करणारी फॅक्टरी होऊन जाते..
शाळेकडून आणि विद्यार्थ्यांकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या जातात. मुलांना शाळेत किती समजते, यापेक्षा पाठांतर त्यांचे हस्ताक्षर यावर गरजेपेक्षा जास्त महत्व दिलं जातं. मुलं त्यालाच शिक्षण समजतात, आणि काही मुलं त्यात निपुण देखील होतात पण पुढे जाऊन त्याला कळते की संकल्पना समजुन घेणे, मिळवलेल्या ज्ञानाच उपयोग करणे, नवनिर्मिती, संशोधन, Out of Box Thinking हे देखील तेवढंच महत्त्वाचं होत, मग स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पुन्हा त्याला वेगळा अभ्यास करावा लागतो, वेगळे कोचिंग क्लास लावावे लागतात.
📀📀📀📀📀📀📀📀📀📀📀
🟣समाजाची अजूनही न बदललेली मानसिकता------
नोकरी मिळवण्यासाठीच शिकायचं असतं. मग सर्व खटाटोप सुरू होतो ज्या कॉलेजातील अधिकात अधिक विद्यार्थी नोकरीला लागले अशाच शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांचा प्रवेश घेतला जातो.
मग कोणत्याही प्रकारे त्या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळावा यासाठी स्पर्धा, चढाओढ.. ती शिक्षण संस्था जर खाजगी मालकीची असेल तर मागेल ती फी देऊन ऍडमिशन घेणे.
जर सरकारी मालकीची असेल तर लग्गेबाजी.. ही मानसिकता एका दिवसात तयार झाली नसून ती हळूहळू टप्या टप्याने तयार झाली आहे. अर्थात शिक्षण म्हणजे कारकून तयार करण्याचा कारखाना नसून एक सृजनशील कर्तव्यदक्ष नागरिक घडवण्यासाठी तयार केलेली एक प्रक्रिया आहे हे समाजाच्या गळी उतरविण्यासाठी काही काळ जावा लागेल.
'विद्यार्थी हा विद्यार्थी न राहता परीक्षार्थी बनला आहे.' हे जवळ जवळ १००% सत्य आहे
असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण 'शिक्षण म्हणजे त्या त्या विषयाची परीक्षा देऊन पास होणे म्हणजे शिक्षण' ही शिक्षणाची व्याख्या रूढ होते की अशी भीती कधी कधी वाटायला लागते. कारण सर्व काही एखादी परिक्षा पास होण्यासाठी चाललेले असते जणू काही ती परीक्षा म्हणजेच जीवन आहे
No comments:
Post a Comment