पोंडवे सीमेजवळ असलेल्या एका शाळेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. शाळेतील ३७ विद्यार्थ्यांना दहशतवाद्यांनी जिवंत जाळले.या हल्ल्यात एकूण ४१ जणांचा मृत्यू झाला.
कॅम्पाला (युगांडा), ता. १७ : पश्चिम युगांडातील एम्पाँडवेमधील लुबिरिहा माध्यमिक शाळेवर 'अलाईड डेमोक्रॅटिक फोर्स'च्या (एडीएफ) या बंडखोरांच्या संघटनेने शुक्रवारी रात्री हल्ला केला. यामध्ये ३८ विद्यार्थ्यासह ४१ जणांचा मृत्यू झाला आहे.
ही शाळा युगांडा आणि काँगो लोकशाही प्रजासत्ताक या देशाच्या सीमेवर आहे. हल्ल्यात एक सुरक्षा रक्षक आणि स्थानिक जमातीमधील दोन सदस्यांची बळी गेला असल्याचे एम्पाँडवे- लुबिरिहाचे महापौर सिल्व्हेस्ट एमपोझे यांनी आज सांगितले. बंडखोरांनी काल रात्री हल्ला केल्यानंतर अनेकांनी काँगोची सीमा ओलांडली.
अशा व्यक्तींचे बंडखोरांनी अपहरण केले. त्यांनी शाळेच्या वसतिगृहाला लावलेल्या आगीत काही विद्यार्थी होरपळले तर काहीजणांवर गोळीबार करण्यात आला. तसेच चाकूने भोसकण्यात आले, असे एमपोझे यांनी सांगितले.
पूर्व काँगोला अस्थिर करण्यासाठी 'एडीएफ'चे बंडखोर काही वर्षांपासून
सातत्याने हल्ले करीत आहेत.
त्यांनी काल लुबिरिहा शाळेवर हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. ही शाळा काँगोपासून दोन किलोमीटर अंतरावरील कॅसेसी जिल्ह्यात आहे. या खासगी शाळेत मुले-मुली एकत्र शिकतात.
सांगितले.
युगांडाच्या सैन्याने हल्लेखोरांचा काँगोच्या विरूंगा राष्ट्रीय उद्यानापर्यंत माग काढला असून अपहरण केलेल्या युगांडाच्या नागरिकांना सोडविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सैन्यदलाने
सांगितले.......
शाळा कांगो सीमेपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर शाळेच्या परिसरातील वसतिगृह पेटवून दिले. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांचा निर्दयीपणा यावरच थांबला नाही. त्यांनी काही जणांना गोळ्या घालून ठार केले. जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨
दहशतवाद्यांकडून काही जणांचे अपहरण-------------
दहशतवाद्यांनी आठ ते दहा जणांचे अपहरणही केले असून त्यांना कांगोतील विरुंगा राष्ट्रीय अभयारण्यात नेले.
■ हा भाग कांगोच्या सीमेजवळ आहे, त्यांच्या सुटकेसाठी युगांडाचे सैनिक प्रयत्नशील आहेत.बंडखोरांची अलाइड डेमोक्रॅटिक फोर्सेस' ही संघटना इस्लामिक स्टेटची शाखा आहे.
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨
१३ वर्षांतील सर्वांत मोठा हल्ला--------
युगांडाच्या कंपाला येथे २०१० मध्ये दुहेरी बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. त्यानंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे.
No comments:
Post a Comment