Thursday, 8 June 2023

🟣👆शिक्षक अतिरिक्तचे संकट टळणार....!एकही शिक्षक होणार नाही अतिरिक्त;या गोष्टी करावे लागणार


🟣👆शिक्षक अतिरिक्तचे संकट टळणार....!एकही शिक्षक होणार नाही अतिरिक्त;या गोष्टी करावे लागणार*

राज्यातील शाळांचे सेवक संच करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, २०२२-२३ चे सेवक संच अंतिम करण्यापूर्वी इनव्हॅलीड आधारकार्ड असलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे. त्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकाच्यांवर सोपविली आहे.

 शिक्षण संचालनालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील शिक्षक अतिरिक्त होण्याचे संकट टळणार आहे.

राज्यात ३० नोव्हेंबर २०२२ च्या पटसंख्येवर सेवक संच निश्चित केले जाणार आहेत. मात्र, त्यासाठी ८० टक्के विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलीड असणे गरजेचे होते. त्या आधारावर सेवक संच केल्यामुळे राज्यात जवळपास ५० हजार शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, आता प्राथमिक व
९० टक्के विद्यार्थी असावेत वैध


माध्यमिकच्या शिक्षण संचालनालयाने सात जूनला परिपत्रक काढले आहे. त्या परिपत्रकानुसार राज्यातील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड व्हॅलीड करण्यासाठी १५ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्या तारखेला ज्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड व्हॅलीड असतील त्या विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन सेवकसंच अंतिम केला जाणार आहे. त्यामुळे राज्यात अतिरिक्त

होणाऱ्या शिक्षकांवरील संकट टळणार आहे. विद्यार्थ्यांच्या नावातील तफावतीवरून किंवा अन्य कोणत्याही कारणावरून विद्यार्थी अवैध ठरत असतील किंवा काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड उपलब्ध नसतील तर २०२२-२३ च्या मंजूर पदावर विपरित परिणाम होणार आहे. हे टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या

आधारकार्डबाबत अडचणी असलेल्या शाळांनी गटशिक्षणाधिकाच्यांकडे अशा विद्यार्थ्यांच्या यादीच्या नावासह अर्ज करायचा आहे.

 गटशिक्षणाधिकारी अशा विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी शाळेत नियमित उपस्थित असतील अशा विद्याथ्र्यांची विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांकडून खात्री करून त्या विद्यार्थ्यांची योग्य ती पडताळणी करतील. 

पडताळणीमध्ये नियमित असलेले विद्यार्थी संचमान्यतेसाठी विचारात घेतले जाणार आहेत.
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
९०%विद्यार्थी असावेत वैध--------------------
ज्या शाळांचे किमान ९० टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वैध आहेत. त्याच शाळेतील उर्वरीत विद्यार्थ्यांच्या बाबतीत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन त्याची पडताळणी करायची आहे.

🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
| पडताळणी करताना या गोष्टी महत्त्वाच्या...

● नाव, लिंग किंवा जन्मतारीख जुळत नसल्यास त्या विद्यार्थ्याची शाळेतील नोंद, प्रत्यक्षात उपस्थिती, तो विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळेत दाखविला नाही याची शहनिशा करावी.

● ज्यांची आधार क्रमांकासाठी नोंद केली आहे, जो शाळेत नियमित उपस्थित आहे, जवळपासच्या शाळेत दाखल नाही, त्याचे आधारकार्ड का तयार होऊ शकले नाही याची शहानिशा करावी.

• शाळेतील विद्यार्थी डुप्लीकेट असल्याचे दर्शवित असेल तर तो नेमक्या कोणत्या शाळेत शिकत आहे याची खात्री करावी.

• शाळेने अर्ज केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती शाळेत जाऊन तपासावी. मुख्याध्यापकांनी सांगितलेला प्रत्येक विद्यार्थी संचमान्यतेसाठी ग्राह्य धरण्यास पात्र आहे का याची खात्री करावी.

● आधार इनव्हॅलीड, अनप्रोसेस, आधार क्रमांक नसलेले विद्यार्थी शाळेत नियमित येत असल्याच्या विविध बाबी लक्षात घेऊन खात्री |पटल्यानंतरच त्या विद्यार्थ्यांस संच मान्यतेसाठी ग्राह्य धरावे, असे प्राथमिकचे शिक्षण संचालक शरद गोसावी व माध्यमिक व उच्च माध्यमिकचे शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
सोलापूर : संतोष सिरसट
पुढारी

No comments:

Post a Comment