वीज पडण्याआधी मोबाइलवर येणार सूचना-------
आता पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत.
जून-जुलैमध्ये वीज पडून मृत्यू होण्याच्या घटना जास्त घडतात.
हे टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या भूविज्ञान मंत्रालयाने दामिनी अॅप तयार केले आहे.
हे अँप मोबाइलवर डाऊनलोड केल्यास वीज पडण्याच्या आधी मोबाइलवर सूचना मिळते.
या अॅपमुळे शेतकयांसह इतरांनाही पावसाळ्याच्या दिवसांत सोईचे होणार आहे. बाहेर पडण्यापूर्वी वीज पडण्याचा अलर्ट जर आपल्याला मिळाला, तर अपघाताचा धोका टाळता येऊ शकतो.
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️
भू विज्ञान मंत्रालयाचे दामिनी अॅप-----
भारत सरकारच्या भू विज्ञान मंत्रालयाने वीज पडण्याचा अलर्ट देणारे एक मोबाइल अॅप आणले आहे. दामिनी अॅप असे या अॅपचे नाव आहे. या अॅपच्या माध्यमातून आपल्याला आता वीज पडण्याची पूर्वसूचना मिळणार असल्यामुळे अँप आता वरदान ठरणार आहे.
दामिनी लिंक-----
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️
पाऊस पडण्याआधी मिळणार सूचना-------
भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने 'दामिनी' अॅप तयार केले आहे. हे दामिनी अॅप वीज पडण्याची पूर्वसूचना आपल्या मोबाइलवर देते. वीज पडताना विजेचा लखलखाट प्रथम दिसतो व नंतर आवाज ऐकू येतो. या अॅपमुळे वीज पडण्याआधीच सूचना मिळेल.
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
प्ले स्टोअरवरून करा 'दामिनी' डाऊनलोड------
हे अॅप भारत सरकारच्या पृथ्वी व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशात्र संस्था, पुणे यांच्याद्वारे विकसित केले. गेले आहे. गुगल प्ले स्टोअरवरून दामिनी हे अँप डाऊनलोड करता येते. हे अॅप सर्व अधिकारी, फिल्ड वर्कर्स, शेतकरी, मेंढपाळ व नागरिकांनी डाऊनलोड करून त्याचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
गतवर्षी वीज पडून मृत्यू-------
वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. जिल्ह्यात दरवर्षी कुठेना कुठे लोक अशाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे प्राण गमावतात. दरवर्षी वीज कोसळल्याने लोक आपला जीव गमावतात. एनसीआरबीच्या अहवालानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू वीज कोसळल्यामुळे झालेले आहेत.
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️
पावसाळ्यात घ्यावयाची काळजी-------
नागरिकांनी महानगरपालिकेच्या नळावाटे होणार्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा. बोअरवेल, कॅनॉल, शुद्धीकरण न केलेल्या विहिरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करू नये.
सार्वजनिक ठिकाणी उदा. शाळा, महाविद्यालये यांना पुरविण्यात येणार्या पाण्याच्या टाकीची सफाई करण्यात यावी.
सर्व हौसिंग सोसायटीमधील पंपवेल व पिण्याच्या पाण्याच्या टाकीची सफाई करून घेण्यात यावी.
शिळे किंवा उघड्यावरचे माश्या बसलेले अन्न पदार्थ खाऊ नयेत, तसेच अन्न पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावेत.
हातगाड्यावर, उघड्यावर विकले जाणारे खाद्य पदार्थ खाऊ नयेत.
ड्रेनेज यंत्रणेत काही दोष असल्यास त्याची माहिती संबंधित क्षेत्रिय कार्यालये यांना द्यावी.
प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करावे.
उलट्या-जुलाब, विषमज्वर वगैरे विकार झाल्यास वेळीच उपचार करून घ्यावेत. सर्व महानगरपालिकेच्या दवाखान्यात आणि डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात उपचाराची सोय उपलब्ध आहे.
पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी उकळून घेऊन पिण्यासाठी वापरण्यात यावे.
नागरिकांनी आपल्या घरातील व सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. ओला व सुका कचरा नियमित वर्गीकरण करावा. ओल्या कचर्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करावी आणि घंटागाडीमध्ये द्यावा. तर सुका कचरा पुणे महानगरपालिकेने नेमलेल्या कचरा गोळ्या करणार्या महिला अथवा खाजगी स्वयंसेवी संस्थेकडे जमा करावा आणि परिसर स्वच्छ राहील अशी काळजी घ्यावी.
डास चावल्यामुळे होणार्या मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया या रोगांसाठी प्रतिबंधात्मक उपाय किटक प्रतिबंधक विभागामार्फत केले जातात.
याबाबत नागरिकांनी क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी, क्षेत्रिय कार्यालये यांचेशी संपर्क साधावा.
सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांचकडे उपचारास आलेल्या कॉलरा, टायफॉईड, गॅस्ट्रो, डिसेंट्री, कावीळ रुग्णांची माहिती आरोग्य खात्यास त्वरित कळवावी.
जेथे लेबर कॅम्प आहे त्या ठिकाणच्या सर्व बांधकाम व्यावसायिकांनी पुणे महानगरपालिकेच्या नळावाटे पुरविलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. जलजन्य आजार होऊ नयेत याबाबत सर्व कामगारांना सूचना देऊन
दक्षता घ्यावी.
पाण्याचे साठे आठवड्यातून किमान एकदा रिकामे करून, घासून पुसून कोरडे करून पुन्हा वापरावेत व पाण्याचे साठे झाकून ठेवावेत.
घराभोवताली नारळाच्या करवंट्या,रिकाम्या बाटल्या इत्यादींचा नायनाट करावा.
वापरात नसलेले टायर्स झाकून ठेवावेत/त्यांची विल्हेवाट लावावी.
कुलर्स, रेफ्रिजरेटर्स यातील पाणी आठवड्यातून किमान एकदा बदलावे.
पूर्ण अंग झाकेल अशा कपड्यांचा वापर करावा.
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️
पावसाळ्यात घ्यावयाची काळजी--------
- पावसात भिजणे शक्यतो टाळा आणि भिजल्यास कोरड्या टॉवेलनं अंग पुसून घ्या
- ओले कपडे जास्त वेळ अंगावर राहू देऊ नका
- पावसातून बाहेरून घरात आल्यावर आधी पाय स्वच्छ कोरडे करावेत. तसेच ओले मोजे वापरू नयेत.
- पावसात भिजल्यास घरी आल्यावर प्रथम अंघोळ करून मगच कोरडे कपडे घालावेत.
- अंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पाने टाकल्यास त्वचेला होणारा जंतुसंसर्ग काही प्रमाणात टाळता येतो.
- केस व कपडे ओले असताना वातानुकूलित जागेमध्ये जाण्याचे टाळावे. त्यामुळे व्हायरल फिव्हर, सर्दी, खोकला असे आजार होण्याची शक्यता असते.
- डास निर्मूलनासाठी विविध उपाययोजना कराव्यात.
- नियमितपणे अंगाला तिळाचे तेल कोमट करून लावावे.
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️
नेमेचि येतो मग पावसाळा' या म्हणीप्रमाणे वाट बघत असलेल्या पावसाची महाराष्ट्रातील काही भागात चांगलीच सुरुवात झाली आहे. पावसासोबत रोगराई येणार असल्यानं नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यात अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. तर काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळाव्या लागणार आहेत.
आरोग्याच्या दृष्टीनं ते फार महत्त्वाचं आहे. कारण पावसाळा आला की अस्वच्छतेमुळे रोगराई झपाट्याने वाढते आणि बारीक-सारीक आजारांना निमंत्रण मिळते. यावर आळा घालण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात कचरा, पाणी साचणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे असते. म्हणून आम्ही यंदाच्या पावसाळ्यात कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत,
आहारविषयक घ्यावयाची काळजी...
⭕- भेळपुरी, पाणीपुरी, भजी, सॅंडविच इत्यादी बाहेरचे, उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे.
⭕- बर्फाचा गोळा, रस्त्यावर मिळणारे फळांचे रस आणि कुल्फी असे पदार्थ टाळावेत.
⭕- तळलेले, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
⭕- मांसाहार करणाऱ्यांनी या काळामध्ये मासे खाणे टाळावे, कारण हा माशांचा प्रजोत्पादनाचा मोसम असतो, त्यामुळे पचनसंस्थेला जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते.
⭕- कोणत्याही प्रकारचे कच्चे अन्नपदार्थ आणि कापून ठेवलेली फळे खाणे टाळावे कारण या अन्नपदार्थांमधून जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. या काळात पचनशक्ती आधीच मंद असते आणि हे अन्नपदार्थ पचायला जड असतात.
⭕- आंबट, शीत पदार्थ टाळावेत.
⭕- आहारामध्ये आले, गवती चहा इत्यादी पदार्थ असावेत.
⭕- पावसाळ्यात नेहमी आरोग्यकारक, चांगले शिजवलेले आणि गरम असे घरचेच जेवण घेणे हितकारक ठरते.
⭕- नेहमीच्या चहाऐवजी जर औषधी चहा, Green Tea घेतला तर आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरते.
⭕कॉफीमुळे Dehyadration होत असल्यामुळे कॉफी घेणे टाळावे.
- प्यायचे पाणी शुद्ध करण्यासाठी water प्युरिफायरचा वापर करावा. ते शक्य नसल्यास पाणी गाळून उकळवून मगच पिण्यासाठी वापरावे.
⭕- अन्नपचन नीट व्हावे, यासाठी या काळात भरपूर पाणी पिणे योग्य ठरते.
⭕- बाहेर पाणी पिणे शक्यतो टाळावे. बाहेर पडताना नेहमी आपली पाण्याची बाटली जवळ ठेवावी.
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️
विजे पासुन बचाव कसा कराल..?
सध्या पावसासोबत विजा कोसळण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे.शेतातील काम करत असताना शेतकरी , शेतमजुर यांना या पासुन ज्यास्त धोका संभवतो त्यामुळे जिवीत हानी टाळण्यासाठी खालील दक्षता घ्या.
१) कोसळणारी विज उंच वस्तु /ठिकाणाकडे आकर्षित होते त्यामुळे उंच झाड , डोंगर , टेकडी यावर विजा कोसळत असताना आश्रय घेणे टाळावे.
२)धातुच्या वस्तु उदा.छञी , चाकु,लोखंडी वस्तु ईत्यादी कडे विज आकर्षित होतात या वस्तु आपल्या पासुन दुर कराव्यात .
३)विजा कोसळत असताना मोबाईल ,संगणक ,टि.व्ही., दुरध्वनी ईत्यादी चा वापर करु नये.
४) ईस्ञी , मोबाईल ईत्यादी साॕकेट मध्ये लावु नये.
५)पाण्यात असल्यास त्वरीत बाहेर यावे.
सुरक्षित जागा.....
१) वाहन हे सुरक्षित ठिकाण आहे.विजा कोसळत असताना चारचाकी वाहनातुन बाहेर येऊ नये.
२)ईमारत , गुहा , कपार हे पन् विजा कोसळत असताना सुरक्षित ठिकाण आहे.
अतिरिक्त दक्षता ...
१)विजा कोसळत असताना मोकळ्या जागेत यावे.जमीनीवर बसुन दोन्ही पाय गुडाघ्यातुन जवळ घ्यावे व दोन्ही हाताने आवळुन त्यावर हुनवटी टेकवुन बसावे.
२)विज आपल्याकडे आकर्षित होत असेल तर अंगावरील केस ऊभे राहतात,हातात पायात मुंग्या अश्या परिस्थीतीत वर सुचना दिल्या प्रमाणे मोकळ्या मैदानात बसावे.
वरील प्रमाणे दक्षता घ्या व याची माहीती इतरांना पन अवश्य द्या.
धन्यवाद .
⭕Fb link---
⭕Whatsapp--
⭕You tube--
No comments:
Post a Comment