Monday, 19 June 2023

⭕भर दिवसा 11वर्षीय लहान मुलीला पळविण्याचा प्रयत्न फसला;मुलीच्या हुशारीचे सर्वत्र कौतुक

⭕भर दिवसा ११ वर्षीय लहान मुलीला पळविण्याचा प्रयत्न फसला;मुलीच्या हुशारीचे सर्वत्र कौतुक----

काल टिळक चौक सोलापूर भागातील रहिवासी त्यांची अकरा वर्षीय मुलगी बेबी (नाव बदलून) ती मध्यवर्ती ठिकाण असलेले टिळक परिसरातून एकटी जात होती.
                              हाच तो हरामखोर
 तिच्यासोबत कोणीही नव्हते.सर्व रस्ता सामसूम असल्याचा फायदा घेत एक अनोळखी व्यक्ती तिचा पाठलाग करत मागे पुढे घुमटत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे.
तो मुलीला त्याच्या उजव्या हाताने तिला पकडत बाजूच्या फूटपाथवर बसतो कळत नकळत तो डाव्या हाताला लावलेल्या ग्लोज चा वापर करून त्याला लावलेला पदार्थ तिच्या नाकासमोर धरतो 
पण मुलीला शंका आल्याने त्याचा हात झटकते तिचा नशीब बत्तल समोरून येणारा माणसामुळे तू घाबरतो व तिथून काढता पाय घेतो.
दैवी कृपेने तिचे ते धाडस व समोरून येणारा माणूस या गोष्टीमुळे मुलगी सुखरूप तिथून निघून जाते.


हा व्हिडिओ पाहणारा प्रत्येक माणसाच्या त्याच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकते.
 आणि हमखास समोरच्या तोंडातून १०-२० शिवाय तर येणारच...

हा कोठेही आढळून आल्यास लगेच पोलिसांना कल्पना द्या

🔴त्या लहान मुलीचे सर्वत्र कौतुक---

त्या मुलीचे धाडस पाहून मनात एकच धडकी भरते.तिच्या या धाडसाची नक्कीच कौतुक केले पाहिजे...
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
नक्कीच ती मुलगी कौतुकास पात्र आहे ती सखी सावित्री आहे त्या मुलीचा मला खूप खूप अभिमान वाटतो यासारखी घटना सीसीटीव्हीमुळे सर्वांना समजले पण मुलीने घरी ही घडलेली घटना लगेच आपल्या आई-वडिलांना सांगितले पाहिजे
 शाळेवरून येताना जाताना कोणत्याही प्रकारची घटना असो विद्यार्थ्यांनी लगेच शिक्षक आई-वडील यांना सांगितले पाहिजे घाबरून न जाता कामा नये प्रत्येक शाळेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था असते.
                         हाच तो हरामखोर
 फोन केल्यावर लगेच काही क्षणात पोलीस हजर होतात आणि कारवाई करतात यासाठी पालकांना माझी नम्र विनंती की त्यांनी मुलांना शाळेचे फोन नंबर शिक्षकांचे पालकांचे व पोलीस मित्र यांच्या मोबाईल नंबरची ओळख करून दिली पाहिजे.
श्री.विजयकुमार तुप्पे
 सहशिक्षक
(सिल्वर ज्यूबली हायस्कूल बार्शी)
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
नवीन पाठ्यपुस्तक दर वर्षी मुलांना मिळतात.
 त्यामध्ये चाईल्ड हेल्पलाइन नंबर पोलीस,अग्निशमक,दामिनी पथक व प्रमुख पोलीस स्टेशन यांचे नंबर छापून आले तर मुले ते लगेच पाठ करू शकतात.

 या घडलेल्या घटलेल्या गोष्टींचा आमचे सोलापूर शहर पोलीस नक्कीच छडा लावतील यात मात्र शंका नाही. पण मुलांना कामाव्यतिरिक्त बाहेर न सोडता अथवा ते कोणासोबत जाणार आहेत याची संपूर्ण माहिती आपल्या जवळ ठेवा.

शाळेवरून आल्यावर मुलांना बोलते करा.
 त्यांच्या अडचणी समजावून घ्या.
त्या मुलीचे धाडस पाहून मी सुद्धा खूप भारावून गेलो आहे.
 श्री.राहुल दत्तात्रय म्हमाणे
 सहशिक्षक 
(प्राथमिक विद्यामंदिर बार्शी)

No comments:

Post a Comment