Wednesday, 14 June 2023

सोलापुरात पुन्हा एकदा लॉकडाऊन ची स्थिती वेगवेगळ्या अफवाने परिसरातील नागरिक भयभीत-----

सोलापुरात पुन्हा एकदा लॉकडाऊन ची स्थिती वेगवेगळ्या अफवाने परिसरातील नागरिक भयभीत-----

पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर दिनांक 13/6/23 च्या आदेशाने सोलापुरात कलम 144 फौजदार दंड प्रक्रिया संहिता 1973 प्रमाणे मनाई आदेश लागू झाला.ज्याअर्थी श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना येथील चिमणी पाडकामासाठी त्याचे कारण म्हणजे श्री सिद्धेश्वर साखर कारखाना बचाव समिती व बचाव मंडळाची कामगारांसमवेत बैठक झाली व सर्वांना एकत्रित येण्याचे आवाहन करण्यात आले.
पण कायदा व्यवस्था यामध्ये बाधा निर्माण होऊ नये म्हणून त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त यांनी 13-6-2023 रोजी दुपारी 14.00 पासून साखर कारखान्यापासून एक किलोमीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारण वगळता संचार करण्यास प्रतिबंध असेल त्याचप्रमाणे एक किलोमीटर परिघात रासलेले सभागृह,मंगल कार्यालय,रेस्टॉरंट बार हॉटेल्स,धार्मिक,स्थळ बंद असतील आदेशाचा भंग केल्या शिक्षेस पात्र होईल हा बंदी आदेश पुढील आदेश पर्यंत अमलात राहील.

🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
अफवांचा गोंधळ-----
 परिसरातील लोकांना पुरेशी माहिती नसल्याने सर्वांचा एकच गोंधळ उडाला आहे.

आता पाच दिवस दुकान बंद राहतील आपल्या कोरोना सारखे वागणूक मिळेल काहींच्या बोलण्यातून आले की काही कामगारांना कोल्हापूर,पुणे येथेच पकडून सोडून देण्यात आले आहे यासारखे अनेक अपवांना पूर आला आहे.

🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
परिसरातील शाळांना फक्त विद्यार्थ्यांना सुट्टी---- 

या परिसरात असणारी श्री सिद्धेश्वर शाळा येथील सर्व विद्यार्थ्यांना उद्याच्या शाळेसंबंधी अजूनही कोणतेही प्रकारची सूचना देण्यात आलेली नाही.लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेच्या ग्रुप वर सूचना देण्यात येतील असे वरिष्ठांनी सांगितलेले आहे. (शाळांचे नियमाप्रमाणे सर्व शिक्षकांना उद्या सकाळी आपल्या शाळेच्या वेळेत हजर राहण्यास सांगितले असून पुढील आदेश येईपर्यंत विद्यार्थ्यांना सुट्टी राहील)

🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
पोलिसांच्या माणुसकीचे दर्शन-----

कलम 144 नुसार पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्रित जमता येत नाही.हे जरी असेल तरी परिसरातील मंगल कार्यालय मध्ये ज्या ठिकाणी विवाह स्थळ आहे.

 त्या लोकांची मानसिक स्थिती पाहून पोलिसांनी हत्तुरेस्ती येथील ठिकाणापासून सर्वांना वाहनाचा वापर न करता चालत जाण्यास परवानगी दिली आहे.

No comments:

Post a Comment