ईडब्ल्यूएस मधून नियुक्तीस उच्च न्यायालयाची स्थगिती;निवड झालेल्या १११ जणांची नियुक्तीपत्रे रोखली----
सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना
ईडब्लूएस प्रवर्गातून नियुक्तीपत्र देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ११४३ जागा भरण्यात आल्या.
यातील १११ नियुक्त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठापुढे आज यासंबंधी तातडीची सुनावणी घेण्यात आली.
त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे नेते आक्रमक झाले
असून या उमेदवारांना नियुक्तीपत्रे मिळावीत यासाठी आंदोलने करण्यात आली
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या ११४३ जागा भरण्यात आल्या होत्या यातील
१११ जणांना ईडब्लूएस अंतर्गत नियुक्तीपत्र देण्यात येणार होते.
मात्र तत्पूर्वीच आज गुरुवार दिनांक ०१ डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने न्याय नियुक्तीला स्थगिती दिली यासंबंधी मराठा क्रांती मोर्चाचे आप्पासाहेब पाटील यांनी प्रतिक्रिया प्रतिक्रिया दिली
ते म्हणाले की जोपर्यंत १११ मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएस अंतर्गत नियुक्तीपत्र मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही हा कार्यक्रम होऊ देणार नाही हा आमच्यावर अन्याय आहे असे म्हटले आहे
याचिका दाखल करणाऱ्यांना दिलासा एमपीएससी कडून उमेदवारी दिलेल्या
१११ जणांच्या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली आहे
आज यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते
या १११ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार होते नियुक्तीपत्र देण्या विरोधात तातडीची याचिका दाखल केलेल्या उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला.
No comments:
Post a Comment