Thursday, 1 December 2022

सात वर्षीय मुलाच्या अपहरणाचा डाव फसला----

  सात वर्षीय मुलाच्या अपहरणाचा डाव फसला----
सात वर्षीय मुलाने दाखवलेल्या हुशारीने उमरगा शहरातील सय्यद वाशा दरगाह गल्लीत बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान अपरांचा डाव फसला
 या घटनेमुळे मात्र शहरात पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे
शहरातील सय्यद भाषा दर्गाह गल्लीत दिवंगत माजी मंत्री काझी यांचे घर असून त्यांचे पुतणे मौझम काझी तेथे राहतात 
बुधवारी मौजम काझी यांचा सात वर्षीय मुलगा हमजा हा घराबाहेर रस्त्यावर थांबला असता
स्कुटीवर आलेल्या इसमाने त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी 
लहान मुलाने हुशारी दाखवत
त्या इसमापासून सुटका करून घेत
आरडाओडो करीत घराकडे पळ काढला 
त्याने वडिलांना सांगितले असता ते तात्काळ बाहेर आले 
परंतु स्कुटी वरील अज्ञात इसमाने तेथून पळ काढला होता 
त्यानंतर मुलाच्या वडिलांनी पोलिसांना याची माहिती दिली असता 
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली
 या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली 
यामुळे मुलाच्या घरासमोर नागरिकांची एकच गर्दी केली होती 
घराकडे येणाऱ्या सर्व मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरा मधील फुटेजेस तपासणी करून शोध सुरू असून मुलाच्या वडिलांनी उमरगा पोलिसात तक्रार दिली आहे 
या घटनेमुळे शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावर निर्माण झाले 
असून पोलीस प्रशासनाने याची दखल घेत 
शोध सुरू केला आहे

No comments:

Post a Comment