Saturday, 3 December 2022

शाळेबाहेर वाटलेल्या चॉकलेट मधून चिताबर्डीत 17 विद्यार्थ्यांना विषबाधा

शाळेबाहेर वाटलेल्या चॉकलेट मधून चिताबर्डीत 17 विद्यार्थ्यांना विषबाधा-----
सीताबर्डी येथील मदन गोपाल अग्रवाल हायस्कूल बाहेर एका अनोळखी व्यक्तीने वाटलेले चॉकलेट्स खाल्ल्याने एकाच वेळी 17 विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला.
शाळा प्रशासनाने तातडीने या विद्यार्थ्यांना
लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले 
यातील दहा विद्यार्थ्यांवर उपचार करून रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली 
तर सात विद्यार्थ्यांना भरती करून घेण्यात आले या घटनेने नागपुरात खळबळ उडाली आहे
पालकांना त्यांच्या मुलांकडून मिळालेल्या माहितीनुसार 
सकाळी दहा वाजता सुमारास काळे कपडे घातलेला एक व्यक्ती काळा कारमधून आला
 त्याने तोंडावर मंकी कॅप घातली होती 
या व्यक्तीने शाळेबाहेरच्या आवारात जमलेल्या मुलांना चॉकलेट्स वाटले आणि तिथून निघून गेला 
साडेदहा वाजताच्या सुमारास दहा ते बारा विद्यार्थ्यांना अचानक पोट दुखीचा त्रास सुरू झाला.
शाळेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली
 पोट दुखत असलेल्या जवळपास 17 विद्यार्थ्यांना जवळच्या लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले हॉस्पिटलमध्ये पालकांची गर्दी झाली होती 
ही घटना whatsapp वर व्हायरल झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे
सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिरलता मंगेशकर हॉस्पिटल वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हर्ष देशमुख म्हणाले 
की सर्व मुलांची प्रकृती स्थिर आहे
 उपचारासाठी दाखल केलेला 17 मुलांपैकी सहा मुलांनी चॉकलेट खाल्लेले नव्हते 
परंतु
 इतरांना पाहून त्यांची पोटदुखीचा त्रास सांगितला 
यामुळे 
दहा मुलांना सायंकाळपर्यंत घरी पाठवण्यात आले 
सर्व मुलांची प्रक्रिस्ती स्थिर असून मुले सहावी व सातवीच्या वर्गातील आहेत
अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखलया प्रकरणाची गंभीर दखल घेत 
अज्ञात व्यक्तीवर कलम 328 अन्वये गुन्हा दाखल केला आहे
तपासणीसाठी चॉकलेट फॉरेन्सिक लॅबकडे
पोलिसांनी काही विद्यार्थ्यांकडून चॉकलेट घेऊन ती तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅब तरी पाठवले 
तर अन्न औषध व प्रशासन येत्या काही दिवसात
 संबंधित चॉकलेट वितरक एजन्सीकडे असलेल्या चॉकलेटची तपासणी करणार आहे

No comments:

Post a Comment