Thursday, 1 December 2022

शिक्षिकेवर हल्ला करणारे २२ विद्यार्थी निलंबित

   शिक्षिकेवर हल्ला करणारे २२ विद्यार्थी निलंबित---
दिब्रुगड--येथील नवोदय विद्यालयातील गर्भवती शिक्षिकेवर हल्ला केल्याप्रकरणी शाळेतील 22 विद्यार्थ्यांना बुधवारी निलंबित करण्यात आले.
शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई केली दहावी आणि अकरावी वर्गातील मुलांच्या गटाने इतिहास विषय शिकवणारे गर्भवती शिक्षिकेवर रविवारी सायंकाळी शाळेच्या आवारात हल्ला केल्याचे उघड झाले होते.
जवाहर नवोदय विद्यालयाचे उपप्राचार्य आणि प्रभारी प्राचार्य रितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार मोरों क्षेत्रात असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयात
 एका शिक्षिकेने पालक शिक्षक संघाच्या बैठकीत एका विद्यार्थ्यांचा अभ्यासाबाबत
पालकांकडे तक्रार केली होती
या तक्रारीमुळे त्या विद्यार्थ्याला शिक्षकेचा राग आला
त्यामुळे दहावी यांनी अकरावीच्या सुमारे ४० हून अधिक विद्यार्थ्यांच्या गटाने
गर्भवती शिक्षकेला घेरले
तिला त्रास देण्यास सुरुवात केली
त्यांना धक्का दिला आणि केसही ओडले 
यावेळी विद्यार्थ्यांनी असभ्य भाषेचा वापर केला
काहींनी मारहाण केल्याची ही प्रत्यक्ष दर्शनी सांगितले एवढेच नाही
तर उपप्राचार्य रितेश कुमार यांना कॉटरमध्ये घुसून मारहाण करण्याची धमकी दिली
 या प्रकारचा शिक्षकेस मानसिक धक्का बसला 
या दरम्यान २२ विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात आले

No comments:

Post a Comment