दहावी-बारावीच्या अर्जांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
पुणे, ता. १४ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी फॉर्म नंबर १७ भरून परीक्षा देणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नावनोंदणी अर्ज करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
खासगी विद्यार्थ्यांना २० ते ३० सप्टेंबरदरम्यान अर्ज करता येणार आहे. फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये
होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी म्हणून नावनोंदणी ऑनलाइन अर्ज नियमित शुल्काने स्वीकारण्यात येत होते.
या अंतर्गत दहावी-बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदत होती.
परंतु आता नियमित शुल्काने नावनोंदणी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे,अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली.
HSC Exam: परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने 12 वी साठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरता येणार आहे.
🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙
⭕यासाठी लागणारे कागदपत्रे---
■ शाळा सोडल्याचा दाखला (मुळ प्रत)
■ आधारकार्ड
■ पासपोर्ट आकारातील फोटो स्कॅन करून अपलोड करावा लागणार
■ मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी
■ अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांना ई-मेलवर प्रत पाठविली जाणार
■ भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्काची पावती आणि हमीपत्र यांसह दोन प्रती विद्यार्थ्यांनी काढून घ्याव्यात
⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
⭕अशी आहे मुदतवाढ-------
तपशील : कालावधी
■ नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाइन
भरणे : २० ते ३० सप्टेंबर
■ मूळ अर्ज, ऑनलाइन नावनोंदणी
शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे : २२ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर
■ माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाइन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावती, एक छायाप्रत, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करणे :
५ ऑक्टोबरपर्यंत
सकाळ
No comments:
Post a Comment