Tuesday, 12 September 2023

गरगर गरगर पवित्र' पोर्टल हलेना;भावी शिक्षकांना नुसता मनस्ताप !

'पवित्र' पोर्टल हलेना;भावी शिक्षकांना नुसता मनस्ताप !

डाटा मिसमॅच
 नोंदणी क्रमांक चुकीचा असल्याचा मेसेज

डीएड,बीएडधारकांना अभियोग्यता परीक्षा देऊन पवित्र पोर्टलव्दारे कायमस्वरुपी शिक्षक भरती होण्याची प्रतीक्षा आहे. काही जिल्हा परिषदांनी आहे.
 कंत्राटी शिक्षक भरण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यातही लवकरच भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. परंतु 'पवित्र' पोर्टलवर नोंदणी केलेल्या उमेदवारांना डाटा मिसमॅच दाखवत आहे, 
तर काहींना रोल नंबर रजिस्ट्रेशन क्रमांक चुकीचा दाखवत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. 
आपण केलेल्या नोंदणीचे काय होणार, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
महाराष्ट्रात शिक्षक पदांची सुमारे ३० हजार पदांची भरती होणार आहे. 
यासाठी पात्रताधारकांनी तयारी सुरू 
केली आहे. 
महाराष्ट्रातील शिक्षक पवित्र पोर्टलसंदर्भात काही तांत्रिक अडचणी असतील तर विभागामार्फत त्या सोडविल्या जातील. 
सध्या जि. प. तील शिक्षक भरती सुरु आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण परीक्षा परिषदेने फेब्रुवारी २०१३ मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२३ परीक्षा घेतली होती, ज्याचा निकाल २४ मार्च २०२३ रोजी लागला. 
या परीक्षत उत्तीर्ण झालेले उमेदवार पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सद्यस्थितीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. 
परंतु पोर्टलवर मिस मॅच डाटा असा मेसेज येत असून पोर्टलवर कुठल्याची प्रकारची माहिती अपलोड करता येत नसल्याच्या तक्रारी
नोंदणी केलेल्या डीएड
बीएडधारकांच्या आहेत.
यासंदर्भात 
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे तक्रारी केली असता यासंदर्भात आम्ही पुणे कार्यालयाला कळवू असे सांगून विभातील अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा संताप पोर्टलवर नोंदणी करणाऱ्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे नाशिक येथील कार्यालयाला या संदर्भात मेल पाठविला, मेसेज पाठविले. परंतु कुठलेही उत्तर मिळत नोंदणी केलल्या डीएड नसल्याची व्यथा नोंदणी करणाऱ्यांनी
मांडली.
राज्यभरातील भरती ही पवित्र पोर्टलमार्फत केली जाते. 
परंतु तांत्रिक अडचणीमुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण पोर्टल सुरू होत नसल्याने भावी शिक्षकांत संताप व्यक्त केला जात नाही.
 परंतु ती लवकरच सुरु होणार
आहे
-रोहिणी कुंभार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
लोकमत पेपर
👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻👩‍💻
पवित्र पोर्टल वर शिक्षक भरती अर्ज भरताना ‘ही’ काळजी घ्या, अन्यथा भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही
⭕पहिली खबरदारी म्हणजे नोंदणी करताना आपला टेट २०२२ चाचणीचा रोल नंबर व रजिस्ट्रेशन क्रमांक दाखल करावा. 
हा रोल नंबर हाच त्यांचा लॉग इन आयडी असेल. 
⭕पवित्र पोर्टलची नोंदणी तसेच स्व प्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया स्वतः करायची आहे. 
⭕अर्ज मराठी व इंग्रजीत उपलब्ध आहे. मात्र नोंदणीसाठी आवश्यक माहिती इंग्रजीत कॅपिटल लेटरमध्ये भरावी. संक्षिप्त नको.
⭕ शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेबाबत असलेली माहिती दिलेल्या क्रमाने भरावी. या पात्रतेच्या सर्व परीक्षा विहित दिनांकपूर्वी म्हणजे १२ फेब्रुवारी २०२३ पर्यंत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 
⭕ज्या उमेदवाराचा निकाल कोणत्याही कारणास्तव राखून ठेवला असेल व असा राखून ठेवलेला निकाल १२ फेब्रुवारी २०२३ नंतर जाहीर झाला असेल तर अशावेळी उमेदवाराने विहित मुदतीत पात्रता धारण केली असे म्हटल्या जाणार नाही. 
⭕पत्र व्यवहाराचा पत्ता इंग्रजीत अचूक टाकावा. 
⭕उमेदवाराने वय, पात्रता, आरक्षण तसेच अन्य गटवारीबाबत न चुकता निर्विवाद दावा करणे आवश्यक आहे. अर्जात तसा दावा केला नसल्यास संबंधित दाव्याचा विचार केल्या जाणार नाही.
⭕शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ यासाठी ऑनलाईन अर्जात उमेदवाराने प्रवर्ग व समांतर आरक्षण आदी बाबी नमूद केल्या आहेत. मात्र नव्या अधिसूचनेनुसार सद्यस्थितीत कागदपत्रे प्राप्त झाली असल्यास प्रवर्ग व समांतर आरक्षणबाबत बदल करता येवू शकतात. शेवटचे म्हणजे आरक्षित प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवाराकडे (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, खुल्या प्रवर्गातील महिला सोडून) उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवाराकडे असे प्रमाणपत्र असणे आवश्यक नाही. 
⭕केवळ आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र आवश्यक आहे..
👩‍🏫👩‍🏫👩‍🏫👩‍🏫👩‍🏫👩‍🏫👩‍🏫👩‍🏫👩‍🏫👩‍🏫👩‍🏫👩‍🏫👩‍🏫👩‍🏫👩‍🏫👩‍🏫👩‍🏫👩‍🏫

No comments:

Post a Comment