Wednesday, 20 September 2023

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रश्नपेढी;शिक्षकांसह तज्ज्ञही सुचवतील प्रश्न!संकेतस्थळाची सुविधा:लॉगिन अनिवार्य

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
महाराष्ट्र राज्य परीक्षा
परिषदेतर्फे इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयार केलेले प्रश्नपेढीचे सॉफ्टवेअर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या हस्ते सोमवारी संपूर्ण राज्याकरिता खुले करण्यात आले.
 या प्रश्नपेढीच्या माध्यमातून राज्यातील प्रतिभावान शिक्षक तसेच तज्ज्ञांकडून शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर प्रश्न प्राप्त होतील
 व पर्यायाने परीक्षेतील गुणवत्तेमध्ये सुधारणा होऊ शकेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
राज्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्याची योजना राज्य शासनाने सन १९९४-९५ या शैक्षणिक वर्षापासून सुरू केलेली आहे. 
विद्यार्थी
दशेतच स्पर्धा परीक्षेची पायाभरणी करणारी ही परीक्षा असून, शालेय स्तरावर या परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्या वतीने दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दसऱ्या किंवा नियोजन केले आहे.
तिसऱ्या रविवारी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. 
यंदा प्रथमच परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार विषयनिहाय,घटकनिहाय प्रश्नपेढी तयार करण्याचे
नियोजन केले आहे.
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
प्रश्नपेढीची कार्यपद्धती काय?
◼️परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर स्वत:ची माहिती भरून नोंदणी करावी.

◼️नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावर प्राप्त लॉगिन आयडी व पासवर्ड वापरून लॉगिन करावे.

■ प्रश्नपेढी निर्मिती या मथळ्याखालील शिष्यवृत्ती परीक्षा हा पर्याय निवडून योग्य तो घटक/उपघटक निवडावा.

■ प्रश्न केवळ शिष्यवृत्तीच्या नेमून दिलेल्या घटकावरच आधारित असावा.
 आपण निर्मिती केलेला प्रश्न, त्याचे चार पर्याय, त्यापैकी उत्तराचा योग्य पर्याय क्रमांक, उत्तराचे स्पष्टीकरण व त्याविषयीचे संदर्भ व आधार आदी सर्व माहिती नोंदवावी.

■सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सबमिट बटणावर क्लिक करुन आपला प्रश्न सबमिट करावा.
लोकमत

No comments:

Post a Comment