Sunday, 24 September 2023

वाचायला येत नाही;डिस्लेक्सिया नाही ना?

वाचायला येत नाही; डिस्लेक्सिया नाही ना?
बौद्धिक अक्षमतेशी संबंध नाही; आजार नसून अवस्था
🕙🕘🕗🕘🕚🕛🕤🕤🕣🕢🕡🕠
काही केले तरी अनेक मुलांना वाचता येत नाही;
 पण त्याचा बौद्धिक अक्षमतेशी काही संबंध नाही. 'डिस्लेक्सिया' मुळेदेखील असे होऊ शकते. 
हा आजार नसून ती अवस्था आहे. 
भारतात लहान मुलांना हा प्रकार होण्याचे प्रमाण अधिक आहे. 
अभिनेता सनी देओललादेखील हाच आजार आहे. 
त्यामुळे वेळीच मुलांचा हा आजार ओळखून त्यांच्यावर उपचार करायला हवेत.
👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻
काय आहे डिस्लेक्सिया ?
डिस्लेक्सिया ही एक प्रकारची अक्षमता असणारा प्रकार आहे.
याचा परिणाम मेंदूच्या लिहिण्या- वाचण्याच्या क्षमतेवर होतो.
त्यालाच रिडिंग डिसॉर्डर असेही म्हणतात. 
या मुलांना अक्षरे ओळखता येत नाहीत.
आकडे वाचताना त्यांची गफलत होते. विशेष करून,एकसारखे दिसणारे आकडे जसे बी आणि डी, ३ आणि ६. १३ आणि ६१ या आकड्यांमध्ये त्यांना लिहिताना व वाचताना गफलत होते.
👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻
कारणे काय ?
हा प्रकार तर खरे पाहता सर्वांनाच असतो;परंतु, काही मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त असते. 
त्याची कारणे वेगवेगळी आहेत. 
जसे, आनुवंशिकता किंवा इतर आहेत.
👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻
लक्षणे काय?
▪️मोठे वाक्य समजण्यास अडचण,
▪️नीट उच्चार न करता येणे,
▪️शब्द नीट न बोलता येणे,
▪️आकडे किंवा साध्या गोष्टी ओळखता न येणे,
▪️खराब अक्षर,
▪️आकडे उलट सुलट काढणे,
▪️गणितात कच्चे असणे,
▪️डावे उजवे,
▪️वर खाली,
▪️दिशा न समजणे किंवा त्यामध्ये अडचणी येणे आदी.
👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻
उपचार काय?
▪️मानसोपचार तज्ज्ञ,
▪️डॉक्टर,
▪️ऑक्युपेशनल थेरपिस्ट,
स्पीच किंवा E लँग्वेज थेरपिस्ट,
▪️विशेष शिक्षक यांच्याकडून उपचार घेऊ शकतात.
 मुलांच्या मनात हीन भावना निर्माण होऊ देऊ नका.
 त्यांना इतर कोणत्या विषयांत रस आहे
 हे पाहून 
त्यामध्ये उत्तेजन देता येऊ शकते.
आपलं लोकमत

No comments:

Post a Comment