आज अंतराळातून पृथ्वीवर येणार खास 'गिफ्ट'
🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️
अमेरिकेची अंतराळ संस्था
'नासा'चे ओसिरिस-रेक्स अंतराळयान पृथ्वीवर आज एक अद्भुत गिफ्ट पाठविणार आहे.
पृथ्वीवर बेन्नू या लघुग्रहाचे नमुने असलेले कॅप्सूल पाठवले जाईल. शास्त्रज्ञ या गिफ्टची वाट पाहत आहेत, पृथ्वीवर येणारा हा पहिला मोठा लघुग्रह नमुना असेल.
ओसिरिस रेक्स हे यान २०१६ मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते.
हे यान स्वतः पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणार नाही, तर कॅप्सूलला पूर्वनिर्धारित स्थानावर अचूक मार्गाने 'ड्रॉप' करेल.
कॅप्सूल अचूक मार्ग व योग्य वेगाने उतरणे आवश्यक आहे.
ड्रॉपच्या वेळी कॅप्सूल खूप उंच कोनात असल्यास,नमुने बाह्य अवकाशात उतरतील.
🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀
सौरमालेच्या इतिहासासाठी 'टाइम कॅप्सूल'
🛟या मोहिमेचे संपूर्ण नाव,ओरिजिन्स स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन,रिसोर्स आयडेंटिफिकेशन, सिक्युरिटी रिंगोलिख एक्सप्लोरर (ओसिरिस- रेक्स) आहे.
मोहिमेतील नमुने महत्त्वाचे आहेत.
कारण बेन्नूसारखे लघुग्रह टाइम कॅप्सूल म्हणून काम करू शकतात.
•🛟नमुने शास्त्रज्ञांना सूर्यमालेची उत्पत्ती आणि उत्क्रांतीबद्दल अधिक माहिती मिळविण्यात, तसेच लघुग्रहांच्या निर्मितीबद्दलचा अभ्यास वाढविण्यास मदत करू शकतात.
🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀
कधी आणि कुठे उतरणार 'टाइम कॅप्सूल'?
भारतीय वेळेनुसार, रविवारी रात्री ८.२५ वाजता उटाहमधील एका वाळवंटात हे कॅप्सूल उतरण्याची शक्यता आहे.
यात सुमारे २५० ग्रॅम सामग्री आहे, जी सुमारे दोन वर्षांपूर्वी ओसिरिस-रेक्सने बेन्नू लघुग्रहावरून गोळा केली होती. १३ मिनिटांत ते पृथ्वीवर पोहोचेल. नासा याचे यू-ट्यूब चॅनल व सोशल
मीडियावर लाइव्ह स्ट्रीम करेल.
जेथून ते पुनर्प्राप्ति केले जाऊ शकत नाहीत.
दुसरीकडे, जर कॅप्सूल खूप कमी कोनात असेल तर ते आपल्या ग्रहाच्या वातावरणात जळून जाईल.
🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️
ओसिरिस एक्स हे पृथ्वीपासून सुमारे एक लाख किलोमीटर अंतरावरुन हे कॅप्सुल पृथ्वीकडे ढकलेल.
सुमारे 43,000 किलोमीटर प्रतितास या वेगाने ही कॅप्सुल पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल.
यावेळी या कॅप्सुलचं तापमान सुमारे 5000 अंश सेल्सिअस एवढं होईल.यानंतर दोन पॅराशूटच्या मदतीने ही कॅप्सुल वाळवंटी भागात लँड करण्यात येईल.
सॉफ्ट लँडिंग करण्याचं नासाचं लक्ष्य असेल. ही संपूर्ण प्रक्रिया 13 मिनिटांमध्ये पार पडेल.
सुमारे 650 वर्ग किलोमीटर भागात ही कॅप्सुल कुठेही पडू शकते. यानंतर नासाचं एक पथक ती कलेक्ट करेल.
No comments:
Post a Comment