Monday, 25 September 2023

रोजाबाग शाळेतील घटनाकुलूप लावून शिक्षिका, वॉचमन घरी; वर्गातच अडकली चिमुकली

⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या रोजाबाग शाळेतील पहिल्या इयत्तेतील विद्यार्थिनी उम्मेखैर मुजम्मिल तय्यब ही वर्गात असताना वॉचमनने सोमवारी दुपारी खोलीला कुलूप लावले,थोड्या वेळानंतर मुलगी खिडकीजवळ येऊन रडू लागली. 
आसपासच्या मुलांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी कुलूप तोडून तिला बाहेर काढले. 
तथापि या घटनेची पालकांनी मनपा प्रशासनाकडे कोणतीही तक्रार केली नाही. 
मात्र, शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे यांनी स्वत: चौकशी सुरू केली.
नेहमीप्रमाणे दुपारी २ वाजता शाळा सुटली;पण पहिलीतील उम्मेखैर ही चिमुकली वर्गातच राहिली. कंत्राटी वॉचमन विठ्ठल बमणे यांनी वर्गखोलीस कुलूप लावले व निघून गेले. 
शिक्षिका नर्गिस फातेमा यासुद्धा निघून गेल्या.
 कोंडलेली चिमुकली खिडकीजवळ येऊन जोरात रडू लागली. 
शाळेजवळ खेळणाऱ्या मुलांनी तो आवाज ऐकला. 
मुलांनी कॉलनीतील परिसरातील काही मोठ्या माणसांना बोलावून आणले. 
त्यांनी हातोड्याने कुलूप तोडून भेदरलेल्या चिमुकलीला बाहेर काढून पालकांच्या स्वाधीन केले.
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
🪭👆अगोदर व्हिडीओ....
नागरिकांनी शिक्षिका व वॉचमन परत येईपर्यंत परिसरातील नागरिकांनी कुलूप हातोड्याने तोडले. 
त्यापूर्वी सर्व घटनेचा व्हिडीओ तयार केला.

उम्मेखैरला बाहेर

काढल्यानंतर नागरिकांनी तिला उचलून घेतले.
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
🪭मनपाकडून चौकशी-
महापालिकेचे
शिक्षणाधिकारी भारत
तीनगोटे यांनी सांगितले की, झालेला प्रकार
अत्यंत दुर्दैवी आहे. 
शिक्षिका आणि
यॉचमनला बोलावून
जबाब घेतला.
मंगळवारी सकाळी मी
शाळेत जाणार आहे.
पालकांनाही बोलावून चर्चा करण्यात येईल.
चौकशीत कोणी दोषी
आढळून आल्यास
त्यांच्यावरही कारवाई
प्रस्तावित केली जाईल. 
या भागातील काही
रहिवाशांनी
लग्नकार्यासाठी शाळेच्या परिसराची मागणी केली
होती. 
शिक्षिकेने नकार दिला. 
त्यावरून काही
वाद सुरू होते.
त्यातून हा प्रकार घडवून
आणल्याची तक्रार आहे. 
सर्व गोष्टींची शहानिशा
केली जाईल.
इयत्ता पहिलीतील उम्मेखैर ही चार वर्षीय चिमुकली अशी वर्गात अडकली.

लोकमत

No comments:

Post a Comment