केरळमध्ये निपाह संसर्गामुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला असून बाधित रुग्णांची संख्या पाचवर पोचली आहे.
राज्य सरकारकडून संवेदनशील भागात सातत्याने चाचण्या घेतल्या जात असून रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना घरातच राहण्याची सूचना केली जात आहे. खबरदारीचे उपाय म्हणून गुरुवारी आणि शुक्रवारी जिल्ह्यातील शाळा, शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात येत आहेत.
कोझिकोडच्या जिल्हाधिकारी ए.गीता यांनी फेसबुक पोस्ट करत शैक्षणिक संस्थांनी दोन दिवस ऑनलाइन वर्गाची व्यवस्था करावी, असे म्हटले आहे.
मात्र विद्यापीठाच्या परीक्षेत कोणताही बदल केलेला नाही, असे स्पष्ट केले.राज्यात २४ वर्षीय आरोग्य कर्मचारी निपाहची लागण झालेली पाचवी रुग्ण आहे.
यादरम्यान कोझिकोडलगत वायनाड
वायनाड प्रशासनाने पंधरा समित्या स्थापन केल्या असून निपाहचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
केरळ सरकारने म्हटले, की राज्यात आढळून आलेला संसर्ग हा बांगलादेशात पहिल्यांदा आढळून आलेला विषाणू आहे. तो माणसातून माणसात पसरतो आणि त्याचा मृत्यूदर
अधिक आहे.
मात्र त्याचा फैलावाचा वेग कमी आहे, असेही नमूद करण्यात आले. आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी उच्च जोखमीत असलेले सर्व ७६ जणांची प्रकृती स्थिती स्थिर असल्याचे सांगितले.
🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬
नऊ वर्षाचा मुलगा 'आयसीयू'त---
जिल्ह्यात १३ जणांत किरकोळ लक्षणे आढळली असून त्यांना
रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.
त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तसेच नऊ वर्षाच्या मुलाला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.
त्याच्या उपचारासाठी
आयसीएमआर'ने 'मोनोक्लोनल 'अॅटीबॉडी' पाठविल्या आहेत.
तसेच मोबाईल लॅबही केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭
केरळमध्ये संसर्ग पसरण्याचा धोका----
मेंदूवर हल्ला करणाऱ्या विषाणूंच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक बोलावण्यात आली होती.
याबाबत माहिती देताना जॉर्ज म्हणाल्या, राज्यात स्थितीवर चर्चा करण्यात आली.
निपाह रोखण्यासाठी राज्यात उपायांची साधने उपलब्ध आहेत आणि त्यामुळे घाबरण्याची गरज नाही.
जागतिक आरोग्य संघटना आणि आयसीएमआरच्या अहवालातून कोझिकोडच नाही तर केरळमध्ये निपाह पसरण्याचा धोका व्यक्त करण्यात आला.
जंगल परिसरातील नागरिकांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
कारण संसर्गबाधित पहिला रुग्ण वनक्षेत्राच्या पाच किलोमीटर परिसरात आढळून आला. कोझिकोड प्रशासनाने सात ग्राम पंचायती अतानचेरी, मारुथोंकारा, तिरुवल्लूर, कुट्टियाडी, कयाक्कोडी, विल्यापल्ली, कविलुम्परा कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले आहे.
🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭
🦠🦠🦠🦠🦠🦠🦠🦠🦠🦠🦠🦠🦠🦠🦠🦠🦠🦠
⭕-कसा होतो फैलाव ?----
हा ‘जुनोटिक’ प्रकारचा विषाणू असून आतापर्यंत झालेल्या संशोधनातून प्राण्यांकरवी, किंवा अन्न-पाण्यातूनही या विषाणूचा फैलाव होऊ शकतो, असे आढळले आहे. यापूर्वी वटवाघळे किंवा डुकरांमार्फत याचा फैलाव झाल्याच्या नोंदी आहेत. प्राण्यांसह माणसांकडून माणसांमध्येही त्याचा प्रसार होऊ शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬
⭕निपाह व्हायरस लक्षणे----
प्रचंड ताप
डोकेदुखी
स्नायूदुखी
उलट्या
मान आखडणे
प्रकाशाची भीती वाटणे
मानसिक गोंधळ
उलट्या आणि बेशुद्ध होणे
श्वास घेण्यास त्रास ही लक्षणे दिसतात.
जर एखाद्या व्यक्तीला निपाह व्हायरसची लागण झाली असेल तर त्याला ताप, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास, घशात खवखव, न्युमोनिया यांसारखी लक्षणे दिसातात...
🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬🧬
⭕निपाह व्हायरस यावर उपाय----
काळजी काय घ्यावी ?
अद्याप या रुग्णांवरील उपचारपद्धती (प्रोटोकॉल)निश्चित झालेली नाही.
त्यामुळे सध्या तरी वटवाघळे किंवा डुकरांच्या संपर्कात येणे टाळावे,
आणि झडांवरून पडलेली-फुटलेली फळे खाणे टाळावे, तसेच मास्क वापरावा आणि वारंवार हात धुवावेत, असे खबरदारीचे उपाय सांगण्यात येत आहेत.
अद्याप या आजाराच्या संदर्भात प्रवेश-प्रवासावरील निर्बंध किंवा ठिकठिकाणी चाचण्या करण्याची कोणतीही शिफारस केलेली नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. मात्र, संशयित रुग्ण आढळल्यास तातडीने त्यांच्या नमुन्यांची तपासणी करणे आणि रुग्णांच्या विलगीकरणाद्वारे संभाव्य फैलाव रोखण्यास प्राधान्य द्यावे,अशी शिफारस संघटनेने सर्व आरोग्य यंत्रणांना केली आहे.
सकाळ
No comments:
Post a Comment