सूर्य मिशन आदित्य-एल 1 लाँच करण्यासाठी सज्ज आहे. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितले की
आदित्य-L1 च्या प्रक्षेपणाची उलटी गिनती आजपासून सुरू होणार असून
2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता
आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण केले जाईल.
कुठे पाहता येणार लाईव्ह?
देशाच्या पहिल्याच सौर मोहिमेचं लाँचिंग थेट पाहून,तुम्हीही या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होऊ शकता.
इस्रोच्या अधिकृत वेबसाईटवर, अधिकृत यूट्यूब चॅनल, अधिकृत फेसबुक पेज आणि एक्स हँडलवर याचं थेट प्रक्षेपण करण्यात येईल.
तुम्ही टीव्हीवर देखील या यानाचं प्रक्षेपण पाहू शकता.
या टीव्ही चॅनलवर हे लाईव्ह दाखवण्यात येईल.
उद्या (शनिवार) सकाळी 11.20 मिनिटांनी थेट प्रक्षेपणास सुरुवात करण्यात येईल,अशी माहिती इस्रोने आपल्या पोस्टमध्ये दिली आहे.
इस्रोच्या isro.gov.in या वेबसाईटला भेट देऊन दर्शक आदित्य L-1 च्या प्रक्षेपणाचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. याशिवाय, इस्रोच्या वेबसाइट आणि यूट्यूब चॅनेलवर लाँचचे थेट प्रसारण केले जाणार आहे.
कसे जाणार आदित्य एल वन?
- ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक यानाद्वारे (पीएसएलव्ही-सी ५७) शनिवारी, दोन ऑक्टोबरला
सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरिकोटा येथून आदित्य एल वन प्रक्षेपित केले जाईल.
हे यान प्रत्यक्ष सौरभूमीवर जाणार नसून,पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटरवरील सूर्याच्या कक्षेत जाणार आहे.
यानाचे गंतव्य स्थान म्हणून निश्चित केलेल्या बिंदूला लग्रांजियन पॉइंट असे म्हटले जाते.
- या ठिकाणी पोहोचण्यासाठी आदित्य यानाला चार महिने लागणार
या बिंदूपासून यानावरील उपकरणे सौर किरीट (सोलर करोना) आणि सौर वायूची निरीक्षणे नोंदवणार
आदित्य’चा प्रवास कसा होणार?
- चांद्रयानाप्रमाणेच आदित्य यानही सुरुवातीला पृथ्वीजवळील एका कक्षेत परिभ्रमण करील.
त्यानंतर हे यानाच्या परिभ्रमण कक्षा अधिकधिक लंबवर्तुळाकार केल्या जातील.
- यानातील प्रणोदकाच्या साह्याने (प्रॉपल्शन मॉड्यूल) ते एल वन पॉइंटच्या दिशेने प्रक्षेपित केले जाईल.
या टप्प्यात यान पृथ्वीची गुरुत्वीय कक्षा ओलांडून पलीकडे जाईल.
सूर्याचं संशोधन इस्त्रोला का करायचंय?
आपल्या ब्रह्मांडाची निर्मिती असंख्य ताऱ्यांपासून बनलेली आहे.
वैज्ञानिक ब्रह्मांडाच्या भविष्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं आपण सौरमालेत आहोत त्या सूर्याचा अभ्यास करणं महत्त्वाचं ठरतं.
सूर्यापासून जितकी ऊर्जा आणि तापमान निर्माण होतं त्याचा अभ्यास पृथ्वीवरुन केला जाऊ शकत नाही.
त्यामुळं जगभरातील अंतराळ संशोधन संस्था सूर्याजवळ जितकं जाता येईल तितकं जाऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात.
नासा आणि यूरोपीयन अंतराळ संशोधन संस्था यांनी सूर्याचा अभ्यास करुन शोध लावले आहेत.
आता आदित्य एल-१ च्या माध्यमातून इस्त्रोचा देखील सूर्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आहे.
आदित्य एल-१ ला पृथ्वीपासून सूर्याच्या दरम्यान १५ लाख किलोमीटर अंतरावर लँग्रेज १ पॉईंटपर्यंत पाठवायचं आहे.
आदित्य एल १ तिथं पोहोचल्यानंतर त्या कक्षेतून ते सूर्यप्रदक्षिणा घालेल.
लँग्रेज पॉईंट काय असतो
सूर्य आणि पृथ्वीदरम्यान एकूण पाच लँग्रेज पॉइंट आहेत. याठिकाणी गुरुत्वाकर्षणाचे केंद्राभिमुख बल बरोबरीत असतं. यामुळं या पॉइंटला कमी इंधनाच्या आधारे अंतराळ यान अभ्यास करु शकतं.
लँग्रेज पाइंटवरुन सूर्याला ग्रहणाशिवाय किंवा विना अडथळा पाहता येतं.
अंतराळ तज्ज्ञ डॉ. अजय लेले म्हणतात, सूर्याला एका विशेष ठिकाणाहून पाहता येतं तो पॉइंट लँग्रेज-१ पॉइंट आहे. पृथ्वीपासून लँग्रेज १ पॉइंट १५ लाख किलोमीटर अंतरावर आहे. आदित्य एल-१ मिशनला एकूण ५ लँग्रेज पॉइंट लक्षात ठेवून निर्माण करण्यात आलं आहे.
आदित्य मिशन एल १ चं ध्येय काय?
डॉ. योगेश्वर मिश्रा म्हणतात, "लँग्रेज-१ पॉइंटवर पृथ्वी आणि सर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाचा कमीत कमी प्रभाव असतो. त्यामुळं तिथं कोणताही उपग्रह स्थापित करणं सोपं असतं. त्यामुळं ऊर्जा देखील कमी लागते.
आदित्य एल १ सूर्याचा अभ्यास करताना चुंबकीय क्षेत्र, मॅग्नेटीक फिल्ड, टोपोलॉजी आणि सौर वायूचा अध्ययन करणार आहे. सूर्याचं क्रोमोस्फिअर आणि कोरोनाचा वेग, सूर्याचं तापमान, कोरोनाचं तापमान, सूर्यापासून निघणारी आग किंवा उष्णता त्याच्या पूर्वीच्या घडामोडींचा, अंतराळातील वातावरण याचा अभ्यास केला जाणार आहे
आदित्य एल १ ला सात पेलोडसह पीएसएलव्हीच्या मदतीनं अंतराळात पाठवलं जाणार आहे. यातील चार पेलोड सूर्याचं निरीक्षण करतील. तीन पेलोड लँग्रेज-१ वरील कण आणि इतर गोष्टींचा शोध घेतली. अंतराळात अभ्यास आणि संशोधनासाठी पाठवल्या जाणाऱ्या उपकरणांना पेलोड म्हणतात.
आदित्य एल १ ला असलेले पेलोडस कोरोनल हीटिंग, कोरोनल मास्क इजेक्शन आणि इतर गोष्टींची माहिती देईल.
अंतराळात होणारे बदल, सूर्याचा कक्षा, सूर्यापासून निघणाऱ्या कणांचा प्रवास याबाबत माहिती संग्रहित करतील.
नासामध्ये काम केलेल्या डॉ. योगेश्वरनाथ मिश्रा यांनी बीबीसीला माहिती देताना सांगितलं की सूर्याची सूर्याची चुंबकीय कक्षा बदलत असते त्यामुळं मोठ्या प्रमाणावर चुंबकीय ऊर्जा निर्माण होते. त्यामध्ये कण असतात त्यातून उजेड निघतो. ते म्हणतात सूर्याच्या आतून जी उष्णता बाहेर पडते त्यातून गरम हवा निघते, त्याला सोलर विंड म्हणतात. त्यात काही कण असतात त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स असतात. ते खूप दूरवर पसरतात.
आदित्य एल १ मिशनचा हेतू?
सूर्य आपल्या जवळचा तारा आहे. तो आगीचा गोळा असून लाखो डिग्री सेल्सिअस उष्ण असून पृथ्वीपेक्षा लाखो पटीनं मोठा आहे.
सूर्यावर हजारो आणि लाखो स्फोट होत असतात. त्यामुळं तिथं चार्ज प्लाज्मा, प्रचंड तापमान आणि चुंबकीय क्षेत्र असतं. स्फोटांमुळं भयाक वादळ निर्माण होतं आणि प्लाज्मा पसरतो. काही वैळा सौर वादळांच्या मार्गात पृथ्वी येते.
मात्र, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळं ते पृथ्वीपर्यंत पोहचू शकत नाही.
पण, पृथ्वीच्या वायूमंडळाला यामुळं धोका निर्माण होतो.
इस्त्रोच्यानुसार सूर्य प्रकाशासह विविध प्रकारचे तरंग आणि चुंबकीय क्षेत्र असतात.
मात्र, ओझोन सारख्या थरांमुळं पृथ्वीपर्यंत पोहोचत नाहीत. आदित्य एल-१ मिशन लँग्रेज १ पॉइंटला स्थापित केलं जाणार आहे. त्या ठिकाणी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा परिणाम नसतो. त्यामुळं त्या ठिकाणाची निवड करण्यात आली आहे.
इस्त्रो पुढील मोठं आव्हान हे आदित्य एल १ यानाला लँग्रेज १ पॉइंटपर्यंत पोहोचवणं हे आहे.
कारण ते अंतर १५ लाख किलोमीटर आहे. पृथ्वीपासून चंद्र तीन लाख किलोमीटर अंतरावर आहे. तिथं यान उतरवण्यात भारताला आता यश आलं आहे.
त्याच्या पाचपट अंतरावर असलेल्या लँग्रेज १ पॉइंटपर्यंत यानाशी संपर्क कायम ठेवणं इस्त्रोपुढील सर्वात मोठं आव्हान आहे.
No comments:
Post a Comment