जेव्हा आपल्यामुळे एखाद्याच्या चेहेऱ्यावर आनंद येतो तो
सुखद अनुभव अविस्मरणीय ठरतो.
घडून गेलेला भूतकाळ आयुष्यात कधी परत येत नाही.
मात्र त्याच्या आठवणी कधीच साथ सोडत नाहीत.
स्वत:शी बोलण्यापेक्षा स्वत:च्या खालोखाल
आणखी एका प्रिय व्यक्तीच्या शोधात माणूस मन आणि घर किती मोठं आहे हे महत्त्वाचे नाही
मनात आणि घरात आपलेपणा किती आहे हे महत्त्वाचे असतं
खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे लोक काय म्हणतील
विश्वातील कोणतीच गोष्ट आपल्या स्वत: साठी नसते.
समुद्र स्वतः पाणी पित नाही,
झाड स्वतः कधी स्वतःचं फळ खात नाही
सुर्य स्वतःसाठी सृष्टीच पोषण करत नाही
फुल आपल्या स्वतःसाठी सुगंध पसरवत नाही
कारण इतरांसाठी जगणं हेचं खरं जिवन आहे
दिसायला सगळचं सुंदर नसतं कधी कधी डोळे सुद्धा धोका खातात
अपेक्षायुक्त स्वप्नात जगताना कष्ट कमी पडलं की
भ्रमनिरास होण्याच्या संधी जास्त संभवतात
ऊन वारा पावसाचा फरक नाही पडत फरक पडतो
तो म्हातारपणी एकटेपणाचा माणसाने कितीही प्रयत्न केले
तरी अंधारात सावली म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कोणाचीच साथ देत नाही
आपल्या हजार चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी
एका चुकीच्या शब्दाकडे हजार लोक लक्ष ठेऊन असतात
प्रेम आणि कौतुक योग्य वेळी व्यक्त न केल्यास त्याची किंमत शुन्य असते
मीठ आणि साखर योग्य प्रमाणात असेल तरच अन्नाला चव येते
तसचं आयुष्याची चव सुध्दा ज्याची त्यानेच सांभाळायची असते
हरायचं तर आहेच
एक दिवस मृत्यूकडून तोपर्यंत आयुष्याला जिंकून घ्या
आजच्या परिस्थितीत स्वत:ला वाचविण्याची धडपड प्रत्येक जण करत असतो.
पण जो निसर्गाचा आणि जिवनाचा विचार करतो
तोच हाडामासाचा शेतकरी असतो
रखरखत्या उन्हात आयुष्याची माती करत लेकरांसाठी सुंदर भविष्याची स्वप्न निस्वार्थ भावनेने गोळा करणाऱ्या
बापाच्या अंगातिल घामाचा सुगंध जर प्रेरणा म्हणून घेता आला ना
तर जगातील कुठल्याच मुलांना कुठल्याही मोटिव्हेशनची गरज कधीच पडणार नाही.
आयुष्यात आपल्याला काही मिळवायचे असेल तर
नम्र व लिन असण्याबरोबर आडकाठी
करणाऱ्या कडे दुर्लक्ष करणे गरजेचे असते
जसे विहीर खणताना अवाढव्य दगडांना दुर्लक्षित करून सर्वांचे लक्ष त्याखाली खळखणाऱ्या झऱ्याच्या पाण्याकडेच असते
आणि त्याच विहीरतून पाणी काढताना बादलीला झुकावे लागते
तेव्हाच मधुर पाणी मिळते
जरा अजबच आहे भाग्य म्हणजे मित्र नाही
तरीही आपल्याशी अबोल असतं बुद्धी म्हणजे लोखंड नाही
तरीही गंज लागतो
सन्मान म्हणजे शरीर नाही
तरीही ते घायाळ होतं
मनुष्य म्हणजे वातावरण नाही
तरीही ते बदलतात
परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे
आपल्या जवळील काही चांगले आपण गमावले
तर वाईट वाटून घेऊ नका
जर आपण काही गमाऊ शकतो तर त्यापेक्षाही चांगलं प्राप्त नक्कीच मिळवू शकतो
पण संयम मात्र बाळगावा.
आपसात तुलना करण्याची सवय अनेकांना असते
तुलना सुरू झाली की
आपल्यातल्या उणीवा शोधण्या ऐवजी आपण आपल्यातला अहंकार जागृत करतो
पण समजुतदार व्यक्ती आपल्यातील दोषांचा विचार करून ते दुर करण्याचा प्रयत्न करतो
लोकांनी आपल्याला मान सन्मान दिला की
आपल्याला खूप मोठं झाल्याची जाणीव होते.
आपल्या पेक्षा श्रेष्ठ व सन्माननीय व्यक्तीचा मोठेपणा मात्र आवडत नाही
त्यावेळी मात्र आपण अजून खूप लहान आहे
हे समजून जाव
No comments:
Post a Comment