झेडपीच्या शाळा पाच मार्चपासून सकाळच्या सत्रात
नवे शैक्षणिक वर्ष 15 जून पासून मुख्य कार्यकारी अधिकारी उद्या घेणार निर्णय-
जिल्हा परिषदेच्या शाळा 5 मार्चपासून सकाळच्या सत्रात भरणार आहेत
उन्हाचा तडाखा आता दिवसेंदिवस वाढू लागला
दरवर्षे प्रमाणे यंदाही उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर
जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा सकाळी ७.३० ते ११.३० वाजेपर्यंत भरणार आहेत
दूर अंतरावरून येणारे विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये
या हेतूने हा निर्णय घेतला जातो शनिवारी तापमानाचा पारा 37 अंश सेल्सिअसच्या वर होता
सोमवारी तापमान अजून वाढेल उन्हाची चटके चिमुकल्यांना बसणार नाहीत
याची खबरदारी शालेय शिक्षण विभागाकडून दरवर्षी घेतली जाते.
मात्र वर्षभरातील सार्वजनिक तथा शासकीय सुट्ट्यांचा विचार करून
कधीपासून सकाळच्या सत्रात शाळा भरवता येईल
याचा कृती आराखडा तयार केला जातो.
उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका असतो आणि उन्हामुळे अध्यापनाला देखील अडचणी निर्माण होतात
त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला 01 मार्च ते 30 एप्रिल या दोन महिन्यात शाळांची वेळ सकाळीच असते
यंदा एक मार्च ऐवजी 5 मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा सुरू होणार आहेत
पण प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यासंबंधीची माहिती देईल त्यानंतर तेच सोमवारी त्यासंबंधीचा अंतिम निर्णय घेणार आहेत.
नवे शैक्षणिक वर्ष 15 जून पासून
जिल्ह्यातील जिल्हाअंतर्गत शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया 27 फेब्रुवारी रोजी पूर्ण होणार आहे
ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून यांना प्रथमच सर्व शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने केल्या जात आहेत परंतु जून जुलैमध्ये होणाऱ्या बदल्या फेब्रुवारी संपला तरी देखील पूर्ण झालेल्या नाहीत
आता पुढील आठवड्यात त्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होईल
पण त्यांना नवीन शाळेवर कधीपासून रुजू व्हावे लागेल
हे अद्याप गुलदस्तातच आहे दरम्यान आगामी शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू होईल
असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे
कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या
2997 शाळा सकाळच्या सत्रात भरतील
01 मार्च की 05 मार्चपासून शाळांच्या वेळा भरतील
यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी पुढील आठवड्यात घेतील
त्यानंतर सर्व शाळांमध्ये त्या निर्णयानुसार अंमलबजावणी केली जाईल.
संजय जावीर
प्राथमिक शिक्षणाधिकारी
जि.प. सोलापूर
No comments:
Post a Comment