Sunday, 12 February 2023

अतिरिक्त शिक्षकांची आता डायट वर नियुक्ती

शिक्षण विभागाचा निर्णय;
अतिरिक्त शिक्षकांची आता डायट वर नियुक्ती
 राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट व प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद कार्यालयात विषय सहाय्यक व समुपदेशनाची पदे भरली जाणार आहेत.
त्या ठिकाणी नव्याने भरती करणे ऐवजी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांमधूनच 540 पदे भरली जाणार आहेत.
 मागील तीन-चार वर्षापासून त्या अतिरिक्त शिक्षकांना शाळांनी हजर करून घेतले नाही
 शिक्षक त्या ठिकाणी रुजू झाले नाही.
 या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने तसा निर्णय घेतला आहे.
जिल्हा परिषद खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील पटसंख्या कमी झाल्याने राज्यातील जवळपास 1200 शिक्षक अतिरिक्त झाले आहेत.
त्यातील साडेसहाशे पेक्षा अधिक शिक्षकांचे समायोजन झालेले नाही.
 तरीपण त्यांना शासनाकडून नियमित दरमहा वेतन दिले जात आहे.
हा प्रकार बंद व्हावा 
म्हणून यापुढे समुपदेशन करून राहिलेल्या अतिरिक्त शिक्षकांना अशाच पद्धतीने शालेय शिक्षण विभागाशी संबंधित विभागांमध्ये नेमले जाणार आहे.
वेळप्रसंगी
 त्या शिक्षकांना 
आंतरजिल्हा बदलीतून दुसऱ्या जिल्ह्यात देखील पाठवले जाणार आहे. 
दरम्यान दरवर्षी निर्माण होणारा अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा पेज आता शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे कायमस्वरूपी मिटेल
 असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे 
दुसरीकडे ज्या शाळा अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेणार नाहीत 
त्यांची पदे रद्द केली जाणार आहेत.
त्या दृष्टीने देखील शिक्षणाधिकाऱ्यांकडून माहिती मागविण्यात आली आहे
शिक्षण संचालकांच्या पत्रातील ठळक बाबी
1) शाळेचे नाव माध्यम विषय नेमणूक व सेवानिवृत्तीचे वर्ष अशा 23 मुद्द्यांवर मागवली माहिती
2) अतिरिक्त शिक्षकांवर आता विषय सहाय्यक व समुपदेशकांची जबाबदारी
3) 540 अतिरिक्त शिक्षकांची डायट यांची NCERT व प्रादेशिक विद्या परिषदेत होणार नेमणूक
4) शाळांवर हजर न होणाऱ्या शिक्षकांना आता दुसऱ्या जिल्ह्यात मिळणार समायोजन

No comments:

Post a Comment