Friday, 17 February 2023

बारावीतील मुलाकडून आईचा गळा दाबून;खून अभ्यास करताना आई रागावल्याने कृत्य

बारावीतील मुलाकडून आईचा गळा दाबून;
खून अभ्यास करताना आई रागावल्याने कृत्य
अभ्यास करताना आई  रागावल्याने मुलाकडून आईचा गळा दाबून खूनवल्याने कृत्य
अभ्यास करताना मोबाईल पहात असलेल्या मुलाला रागविल्याने बारावीतील मुलाने आईचा गळा दाबून तिचा खून केलाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 
लोणी काळभोर पोलिसांनी जीशान जमीर शेख (वय 18) या मुलाला अटक केली आहे.
 तस्लिम जमीर शेख (वय 37) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे
 याबाबत पोलीस निरीक्षक अमोल घोडके यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिरण्यात दिली आहे.
ही घटना उरळी कांचन येथील माऊली कृपा इमारतीत 15 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली तस्लिम शेख हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना माहिती मिळाली होती 
त्यानुसार पोलिसांनी  शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला 
त्यात गळा दाबून व डोक्याला जखम झाल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिला.
 याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी सांगितले की
 डॉक्टरांच्या अहवाला नंतर पोलिसांनी चौकशी केली 
तेव्हा कोणीही माहिती देण्यास तयार नव्हते.
त्यामुळे सुरुवातीला पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध कुणाचा गुन्हा दाखल केला 
ही घटना घडली तेव्हा वडील जमीर आणि मुलगा जिशान हे दोघे तेथे होते 
त्यांच्याकडे स्वतंत्र चौकशी केल्यावर मुलाने घडलेली घटना सांगितली.
जमीर शेख हे नमाज पटणासाठी गेले होते.
त्यांची धाकटी मुलगी बाहेर गेली होती.
मुलगा जीशान हा बारावीला आहे तो अभ्यास करीत असताना मोबाईल पाहत बसला होता 
ते पाहून आई जिशान रागवली त्याच्या गालावर चापट मारले 
त्यामुळे जिशान याने आईला जोरात भिंतीवर ढकलले 
आणि तिचा गळा दाबला 
त्यात तिचा मृत्यू झाला 
आई निपचित पडल्याचे पाहून जिशान घाबरला 
त्यांनी ब्लेडने तिचे मनगट कापले.
मात्र मृत्यू झाल्याने रक्त आले नाही.
त्याने वायर पंख्याला अडकवली फरशीवर आईचा मृतदेह ठेवला
 काही वेळाने जमीर शेख आल्यावर आईने गळफास घेतला
 मी तिला खाली उतरून ठेवण्याचे सांगितले 
त्यांनी तसलीम यांना रुग्णालयात नेले
 डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी ससून रुग्णालयात नेण्यात सांगितले.
 शवविच्छेदनात खुनाचा प्रकार समोर आला आहे

No comments:

Post a Comment