इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
१)परीक्षेला जाताना तुमची हॉल तिकीट चांगले चालणारे दोन ते तीन बॉलपेन एकाच रंगाच्या घ्या काळ्या किंवा निळ्या रंगाच्या'
२)तुमच्यासोबत दोन रुमाल असायलाच हवेत कारण तुमच्या तळहाताला नेहमी घाम येत असतो घामामुळे उत्तर पत्रिका खराब व्हायला नको म्हणून थोड्या थोड्या वेळाने तळहात पुसा आठवणीने
३) तुमची पाण्याची बाटली बेंचवर ठेवू नका तुम्हाला पाणी हवे असल्यास पेपर बाजूला करून पेपरवर पाणी पडणार नाही या पद्धतीने पाणी प्या.
४) पेपर सोडवताना तुम्हाला पूर्ण दीड तास वेळ घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा गडबड करून पेपर लवकर सोडू नका वेळेचे नियोजन करा.
५) पेपर सोडविताना प्रत्येक प्रश्न पूर्ण वाचा त्यानंतरच प्रश्नाचे अचूक उत्तर पर्यायातून निवडा आणि महत्त्वाचे म्हणजे उत्तर पत्रिकेत त्याच प्रश्नांचा क्रमांक पाहून नंतरचा तुमचा उत्तर पर्याय रंगवा.
६) रंगवताना गोल पूर्ण रंगवायला पाहिजे.
७) प्रश्न पूर्ण वाचल्याशिवाय उत्तर गोल करू नये.
८) जेव्हा तुमचे गणित बुद्धिमत्ता विषयाचे उदाहरण सोडून होईल तेव्हा प्रत्येक वेळेस रिचेक म्हणजेच परत तपासून घ्या कारण अशा वेळेत सोपे उदाहरण चुकत असतात.
९) बुद्धिमत्ता विषयांमधील आकृत्या व्यवस्थित निरीक्षण करून सोडवा.
१०) गणितातील प्रश्न सोडविताना सर्वात अगोदर एक लक्षात ठेवा गणितातील प्रत्येक प्रश्न सोडवल्याशिवाय उत्तर अंदाजे करू नका कितीही सोपा प्रश्न असू द्या तो सोडवाच.
११) कधी कधी सुरुवातीला पाच ते सहा प्रश्न खूप सोपे येतात आणि आपण रिलॅक्स होतो आणि उत्तर तोंडी करायचा प्रयत्न करतो आणि इथेच खऱ्या चुका होत असतात हे लक्षात ठेवा.
१२)परीक्षक केंद्रावर वेळेच्या आधी लवकर पोहोचा.
१३) बैठक क्रमांक शोधण्यास वेळ जाणार नाही.
१४) उतारा कविता जाहिरात आणि संवाद व्यवस्थित वाचून घ्या त्यानंतरच एकेक प्रश्न सोडवायला सुरुवात करा प्रत्येक प्रश्नचिन्हापर्यंत व्यवस्थित वाचा.
१५) शेवटी एकच म्हणेल तुम्ही वर्षभर केलेल्या अभ्यासाला दीड तासाच्या वेळात दोन पेपर मध्ये 75 प्रश्न तुम्ही अचूक आणि कमी वेळेत कसे सोडवाल यावर सर्व यश अवलंबून आहे.
सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा....!
rahul2407.blogspot.com
No comments:
Post a Comment