Sunday, 12 February 2023

प्रश्नपत्रिका वाटपानंतर विद्यार्थ्याला नो एन्ट्री बोर्डाचा निर्णय

दहावी बारावी 
प्रश्नपत्रिका वाटपानंतर विद्यार्थ्याला नो एन्ट्री बोर्डाचा निर्णय बोर्डाचा
 निर्णय कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथके
दहावी बारावीचे परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी
 यासाठी बोर्डाने प्रश्नपत्रिका दहा मिनिटे अगोदर देणार नसल्याचे स्पष्ट केली आहे 
दुसरीकडे परीक्षा सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत उशिराने आलेल्या विद्यार्थ्यास परीक्षेला बसण्यास दिली जाणारी नाही परवानगी देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे 
त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला पेपर सुरू होण्यापूर्वीच केंद्रावर हजर राहणे बंधनकारक असणार आहे राज्यातील काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचे प्रकार चालायचे 
दुसरीकडे पेपर सुरू झाल्यानंतर काही शिक्षक विद्यार्थ्यांना पासिंग पुरते वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे सांगतात 
हे अनुचित प्रकार कायमचे बंद व्हावेत 
हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये 
यासाठी बोर्डाने परीक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकांमध्ये वाढ केली आहे
 बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी व सचिव अनुराधा ओक यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षांचे ठोस निर्णय
 यांचे नियोजन करण्यात आले आहे 
दरम्यान उत्तर पत्रिका विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर मिळेल 
पण प्रश्नपत्रिका बरोबर अकरा वाजता म्हणजेच पेपरची वेळ झाल्यावरच दिली जाणार आहे
 दुसरीकडे बैठे बसकासोबत चे प्रश्नपत्रिका पोज करणाऱ्या रनरवरील जबाबदारी वाढवली आहे 
कस्टडीतून प्रश्नपत्रिका घेऊन निघाल्यानंतर
 अधून मधून त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग बोर्डाला पाठवावे लागणार आहे 
तसेच परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर वेळोवेळी रनर ला 
त्यांच्याकडील मोबाईल किंवा कॅमेरात व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे लागणार आहे 
तत्पूर्वी बोर्ड परीक्षेला कॉपी करणे गुन्हा आहे 
कॉपी केल्यास काय शिक्षा होऊ शकते 
पेपर पारदर्शक व प्रामाणिकपणे कसा सोडवायचा याचे धडे शिक्षक आणि प्रत्येक विद्यार्थ्यास प्रात्यक्षिक परीक्षेच्या काळात द्यायचे आहेत
 प्रत्येक विद्यार्थ्याच्या हॉल तिकीट मागे देखील त्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना बोर्डाने दिल्या
 आहेत 
रनर कडे व्हिडिओ रेकॉर्डिंग ची जबाबदारी--- दहावी बारावीची परीक्षा यांना कॉपीमुक्त व्हावे 
यासाठी बोर्डाने नवीन नियमावली तयार केली आहे
 परीक्षेवर वॉच ठेवण्यासाठी
 जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक,पोलीस आयुक्त जिल्हा,परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता पथकांची देखील
 भरारी पथके नेमली जाणार आहेत
 राज्याच्या मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्यासंबंधीच्या सूचना केल्या आहेत 
दुसरीकडे प्रश्नपत्रिका घेऊन परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या रनरला कस्टडीतून निघाल्यापासून केंद्रावर पोचेपर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे लागणार आहे 

तसेच केंद्र संचालकांना सीलबंद पाकीट देताना व दालनात प्रश्नपत्रिका वाटप करतानाही 
व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे लागणार आहे  


 हे लक्षात ठेवा
1) प्रश्नपत्रिका तील सर्व प्रश्नांची उत्तरे वेळेत लिहिण्याचा सराव करावा
2) कॉपी केल्यास होईल कारवाई ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची उत्तरे सांगितली जाणार नाहीत
3) पेपर सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास परीक्षा केंद्रावर पोहोचा
4) संपूर्ण तयारीनिशी परीक्षेला सामोरे जा कशाचीही मनावर तणाव नसावा

No comments:

Post a Comment