Monday, 27 February 2023

आजच्या महत्त्वाच्या बातम्या मंगळवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२३

अत्यंत महत्त्वाचे Student Portal,आधार बाबतची माहिती 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत अंतिम अहवाल सादर करणे बाबत

स्टुडन्ट पोर्टल व आधार कामकाजासाठी अंतिम कालमर्यादा निश्चित करून घेणे बाबत
दि-27 फेब्रुवारी 2023
उपरोक्त विषयास अनुसरून माननीय शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र
 कळवण्यात येते की संदर्भीय पत्राची प्रत सोबत जोडली आहे

 सदर पत्रात नमूद केल्याप्रमाणे माननीय आयुक्त यांनी आधार नोंदणी व दुरुस्ती कामाकरिता काल मर्यादा निश्चित करून सदर काम तातडीने करणे बाबत आदेशित केलेले आहे. सदरची माहिती 28/2/2023 पर्यंत पूर्ण करावयाचे आहे.
सदर कामी तालुका स्तरावर उपलब्ध असलेले आधार किट यंत्रणा पूर्ण क्षमतेने वापरायची आहे.

सदर यंत्रणा काही अडचणी असल्यास आपल्या स्तरावर तातडीने दुरुस्त करून सदर कामास प्राधान्य द्यायचे आहे.
तरी आपले अधिनस्त केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी पर्यवेक्षक इत्यादी यांच्या कामाचे नियोजन करून ज्या शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार बाबतची जी काम अपूर्ण आहेत असे विद्यार्थी सरळ प्रणाली वरून शाळेकडून उपलब्ध करून घ्यावे.

आणि सदर विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून काम पूर्ण करून घ्यावे.
तसेच ब-5 मध्ये विद्यार्थी पटावर जरी असले तरी ते शाळाबाह्य झालेले असतात.

याची देखील तपास करून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी.
वेळेत कार्यवाही पूर्ण करून 28/2/2023 रोजी आधार अपडेट चा अंतिम अहवाल कार्यालयात सादर करावा

 श्री.औदुंबर उकिरडे 
शिक्षण उपसंचालक 
पुणे विभाग
पुणे-1

Sunday, 26 February 2023

मराठी भाषेचे माधुर्य.....

भाषेचे माधुर्य.....

     मराठी भाषा अप्रतिम सौंदर्याने नटलेली आहे... शब्दांच्या विविध छटा असलेल्या मराठी भाषेत एका शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात... मराठी भाषा ही आपल्याला आपल्या पूर्वजाकडून प्राप्त झाली आहे. मराठी भाषा ही खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आपल्या महाराष्ट्राला मराठी साहित्याचा खूप मोठा इतिहास आहे याच मराठी भाषेने आपल्याला कुसुमाग्रज, बा.भ .बोरकर, शांता शेळके ,केशवसुत यासारखे अनेक कवी वि. स .खांडेकर, प्र .के. अत्रे यांच्यासारखे अनेक लेखक दिले. मराठी साहित्य खूप मोठे आहे त्याची ओळख करून घेणे व आजच्या पिढीला ओळख करून देणे गरजेचे होत चालले आहे.

           माझा मराठीची बोलू कौतुके ,
           परी अमृतातेही पैजासी जिंके |

       असे म्हणत संत शिरोमणी ज्ञानेश्वरांनी मराठी वाङ्मयाचे समृद्ध दालन उघडले. मग ही ऐतिहासिक परंपरा सद्गुरू संत तुकारामापासून ते कविवर्य मंगेश पाडगावकरा पर्यंत..... अनेक दिग्गज साहित्यिक प्रतिभावंतांनी  हा समग्र वारसा पुढे चालविला.... आपल्या अभिजात अजरामर मराठी साहित्य कलाकृतीने मराठी समाज मनावर गारुड केले. मराठी भाषेवर नितांत व निस्सीम प्रेम केले .मराठी भाषेची अभिरुची खऱ्या अर्थाने वैश्विक केली. मराठी ज्ञानभाषा ही मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक बनली. मराठी भाषेची वैविध्यता सर्वांगाने फुलते. भाषा ही दर बारा मैलावर बदलते असे म्हणतात. विविध रंग, ढंग ,वैशिष्ट्ये अशी मोहक रूपे घेऊन ती नदीसारखी प्रवाही राहते. प्रांतीय बोली भाषेचे माधुर्य आणि एकात्मता आपल्या या मायबोलीने कायम टिकवले आहे. 

           "ने मजसी ने परत मातृभूमीला
           सागरा , प्राण तळमळला, सागरा! "

               असे म्हणणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा देश आहे. परदेशी जाऊनही आपली मायबोली आणि आपल्या देशावर एवढे प्रेम करणारे लोक आपल्या याच महाराष्ट्राने आपल्याला दिले आहेत. म्हणूनच मराठी भाषेचा जागर करून तिचे संवर्धन करूया...

सौ- वैशाली रविंद्र डोंबाळे

आजच्या महत्त्वाच्या बातम्या सोमवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२३