सोलापूर हे 🪢🪢🧶🧵🧵चादरीसाठी प्रसिद्ध आहे, हे तर आपणा सर्वांनाच माहित आहे. पण त्यासाठी लागणारा दोरा कशाप्रकारे बनवतात?? हे जर माहीत नसेल तर पालथ्या घागरीवर पाणी असेच म्हणावे लागेल..
पूर्वी सोलापुराचे उद्योगधंदे हे इतके होते की लोकांना भरपूर काम धंदा उपलब्ध होत असत.
अलीकडे सर्व उद्योगधंदे एमआयडीसी मधील कंपनी हे सर्व हळूहळू का होईना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, यासाठी कारणं कोणतीही असोत.
असेच सोलापूर मधील कित्येक 🧵सूत मिल आज बंद आहेत.
या सूत मिल पासून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होत असे.
व्हिडिओ पाहण्यासाठी👇👇👇
स्पिनिंग मिल ही एक औद्योगिक उत्पादन सुविधा आहे,जी कच्चा माल घेते आणि तयार उत्पादनांमध्ये रूपांतरित करते.
कापड गिरण्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पिनिंग मिल हा शब्द कातलेल्या धाग्यांचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना सूचित करतो.
हे धागे शिवणकाम आणि विणकामासाठी वापरले जातात,परंतु ते कार्पेट,दोरी आणि सुतळीसह इतर उत्पादनांमध्ये देखील तयार केले जाऊ शकतात.
यातील काही धागे नैसर्गिक नसून कृत्रिम तंतूंपासूनही कातलेले असतात.
मग यामध्ये (सुती,रेशीम,नायलॉन,टेरिलीन, ऑरलॉन यासारखे खूप दोऱ्याचे प्रकार असतात.)
या स्पिनिंग मिल मध्ये कापसाचा वापर करून त्याच्यावर वेगवेगळी प्रक्रिया करून त्यापासून धागे तयार केले जातात.
ते धागे टॉवेल,चादर,नॅपकिन यासाठी वापरले जातात..
ही प्रक्रिया करताना यासाठी अनेक कामगार अहोरात्र काम करत असतात. त्यासाठी लागणारे मशिनरी सुद्धा याची योग्य प्रकारे काळजी घेतली की ते सुद्धा उत्तमरीत्या काम करत असतात.
यासाठी सर्वांचेच कष्ट खूप महत्त्वाचे आह हे व्यवस्थित चालण्यासाठी त्याचे तापमान व्यवस्थित करण्यासाठी त्यावर पाण्याचे बारीक फवारे सोडले जातात..
हे सर्व 📡📡📡मशीन आत्याधुनिक असून खूप मोठे किमतीचे आहेत..
यासाठी लागणारा कच्चामाल हे बाहेरून आल्यानंतर त्यावर पिंजण्यापासून ते अनेक प्रक्रिया केली जाते..
हे स्पिनिंग मिल आज आम्हाला सरांमुळे पाहता आले व सर्व आमच्या परिवारातील त्यासोबत बच्चेकंपनी यांनाही याची सर्व माहिती मिळाली आणि ही माहिती मुलांसाठी खूप प्रेरणादायी ठरली.
युट्युब व सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती 📱📹मोबाईलवर सहज उपलब्ध झाली असती व पाहायला मिळाले असते पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव आज आमच्या बालचमूंना घेता आला...
🗒️🗒️🗒️🗒️🗒️🗒️🗒️🗒️🗒️
आपणही याचा अनुभव घेऊ शकता फक्त आपल्या शाळेतील लेटर पॅडवर त्यांच्या कंपनीला भेटण्यासाठी एक लिखित पत्र द्यावे लागेल.
Shivyya Masute sir 919423603711
सुरज मसुती -7757042025
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
No comments:
Post a Comment