Thursday, 21 November 2024

इलेक्शन ड्युटी बजावून परतताना काळाची झडप,भीषण अपघातात शिक्षकाचा मृत्यू

इलेक्शन ड्युटी बजावून परतताना काळाची झडप, भीषण अपघातात शिक्षकाचा मृत्यू
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
लक्ष्मीकांत वासुदेव पाटील हे जळगाव चोपडा तालुक्यातील अनवर्दे बुधगाव येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत होते.
परिवारासह ते गावात राहत होते.
बुधवार दिनांक 21 नोव्हेंबर दरम्यान त्यांची निवडणुकीनिमित्त शासनाने ड्युटी लावली होती.

राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. काल सर्वत्र मतदानाची प्रक्रिया पार पडली.
त्याचदरम्यान, जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यात मतदान कर्तव्यावर असलेले लक्ष्मीकांत वासुदेव पाटील (वय ४९) उपशिक्षक अनवर्दे बुधगांव हे मतदानाच्या (बी.एल.ओ) कर्तव्यावरून त्यांच्या बभळाज तालुका शिरपूर मूळगावी परत जात असताना मोटारसायकलचा अपघात झाला.
त्यात त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी या अत्यंत दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.


लक्ष्मीकांत वासुदेव पाटील हे चोपडा तालुक्यातील अनवर्दे बुधगाव येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत होते. परिवारासह ते गावात राहत होते. दरम्यान त्यांची निवडणुकीनिमित्त शासनाने ड्युटी लावली होती. मतदान कर्तव्यावर असताना व काम आटोपून घरी बभळाज गावी रात्री परत जात असताना संध्याकाळी ७ वाजेनंतर हातेड गलंगी दरम्यान व चोपडा शिरपूर रस्त्यावर गलंगी चौकात त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला.
नागरिकांनी त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे त्यांना मयत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान घटनेबद्दल चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे लक्ष्मीकांत पाटील यांच्या परिवारावर शोककळा पसरली आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जे झाले ते खूप वाईट झाले.
यावर विश्वासच बसत नाही.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो
शोकाकुल:-समस्त शिक्षक वृंद 

No comments:

Post a Comment