Thursday, 14 November 2024

दिनांक १८,१९ व २० नोव्हेंबर, २०२४ रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय (विस्तार), दालन क्र. ४१५. मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चोक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

E-mail id: sd4.sesd-mh@gov.in
दूरध्वनी क्र. २२०२४७८५
क्रमांक :- संकीर्ण-२०२४/प्र.क्र.३३२/एसडी-४
प्रति.
दिनांक : १४ नोव्हेंबर,२०२४
आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य,पुणे

विषय :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने दिनांक १८,१९ व २० नोव्हेंबर, २०२४ रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत.

संदर्भ :- आपले पत्र क्र. आशिका / प्राथ / १०६/निवडणूक सुटी / ६८३१, दिनांक १३ नोव्हेंबर, २०२४.

महोदय,
उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने दिनांक १८,१९ व २० नोव्हेंबर,२०२४ रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव आपण शासन मान्यतेसाठी सादर केला आहे.
सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की,विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल,त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेणेबाबत आपण आपल्यास्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात,ही विनंती.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
आपला,
(तुषार महाजन)
उपसचिव,महाराष्ट्र शासन

No comments:

Post a Comment