परिषदेमार्फत रविवारी (दि. १०) शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे.
त्याच अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने परीक्षेसंदर्भातील तयारी पूर्ण केली आहे.
जिल्ह्यातील १३ हजार भावी शिक्षक टीईटी परीक्षा देणार असून,प्रत्येक परीक्षार्थी उमेदवारांची बायोमेट्रिक अन् चेहरा स्कॅन करण्यात येणार आहे.
यंदा ही परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध,पारदर्शकपणे होणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने सांगितले.
राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात टीईटी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
सदर परीक्षेचे प्रवेशपत्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
उमदेवारांनी १० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत संबंधित प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावे,असे शिक्षण विभागाने कळविले आहे.
⭕असे करा हॉल तिकीट डाउनलोड---
MAHA TET परीक्षेचे प्रवेशपत्र 28 ऑक्टोबर 2024 ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ऑनलाइन उपलब्ध होईल.
अधिकृतपणे प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवार अधिकृत वेबसाइट mahatet.in वरून MAHA TET हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. पुढील वापरासाठी हॉल तिकिटाची प्रिंटआउट घेण्याचे लक्षात ठेवा
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕पेपरचे वेळापत्रक----
१० नोव्हेंबरला सकाळच्या सत्रात १०.३० ते ०१.०० दरम्यान शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १ होणार आहे. त्यानंतर दीड तासांचा ब्रेक असणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर २ दुपारी ०२.३० ते ०५.०० पर्यंत होणार आहे.
यामध्ये 'पेपर-१' साठी एक लाख ५२ हजार ५९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून,४३१ परीक्षा केंद्रावरून ही परीक्षा होणार आहे.
'पेपर-२' दोनसाठी दोन लाख एक हजार ३४० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये गणित आणि विज्ञान विषयाचे ७५ हजार ५९७ परीक्षार्थी, तर सोशल सायन्सचे एक लाख २५ हजार ७४३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ५९८ केंद्रांवरून ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा परिषदेने २०२१मध्ये घेतलेल्या 'टीईटी' परीक्षेच्या तुलनेत २०२४मध्ये परीक्षार्थींची संख्या वाढली आहे. २०२१मध्ये तीन लाख तीस हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा मागील परीक्षेच्या तुलनेत परीक्षार्थींच्या संख्येत वाढ झाली आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕आवश्यक कागदपत्रे:----------
▪️MAHA TET प्रवेशपत्राची छापील प्रत सोबत ठेवा.
▪️एक वैध फोटो ओळखपत्र (जसे की
▪️आधार,
▪️पॅन कार्ड,
▪️मतदार ओळखपत्र इ.)
▪️स्टेशनरी: काळा किंवा निळा बॉलपॉईंट पेन (आवश्यक असल्यास) फक्त आवश्यक वस्तू सोबत ठेवा.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
TET किंवा Tet म्हणजे काय? : टीईटी म्हणून ओळखली जाणारी शिक्षक पात्रता परीक्षा ही एक पात्रता परीक्षा आहे,जी सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या भरतीसाठी दरवर्षी घेतली जाते.
शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी सरकारने शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षा घेतली. टीईटी परीक्षा राज्य सरकार आणि सीटीईटी परीक्षा केंद्र सरकार घेते.
या परीक्षेत उत्तीर्ण होणारे उमेदवार पात्र मानले जातात आणि सरकारी शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी नियुक्त केले जातात.
TET परीक्षा प्रत्येक राज्याच्या व्यावसायिक परीक्षा मंडळाद्वारे घेतली जाते. TET परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, उमेदवाराला इयत्ता 1 ते 5 व इयत्ता 6 वी साठी प्राथमिक शिक्षक (प्राथमिक शिक्षक) आणि इयत्ता 6 ते 8 वी साठी उच्च प्राथमिक शिक्षक (उच्च प्राथमिक शिक्षक) नियुक्तीसाठी पात्रता प्रमाणपत्र दिले जाते.टीईटी परीक्षेत दोन पेपर असतात.
पेपर 1 हा प्राथमिक शिक्षकांसाठी आणि पेपर 2 हा उच्च प्राथमिक शिक्षकांसाठी आहे. पात्र उमेदवार कोणत्याही एका पेपरमध्ये किंवा दोन्ही पेपरमध्ये उपस्थित राहू शकतात. टीईटी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची राज्य सरकारांकडून सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या भरतीसाठी निवड केली जाते.
⭕टीईटी अभ्यासक्रम:----
▪️ पेपर १ : बाल विकास आणि शिकवण्याच्या पद्धती,इंग्रजी, भाषा-2,गणितपर्यावरण अभ्यास
▪️टीईटी अभ्यासक्रम पेपर २: बाल विकास आणि अध्यापनशास्त्र,भाषा – १, भाषा – 2,विज्ञान आणि गणित किंवा सामाजिक विज्ञान
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
No comments:
Post a Comment