Friday, 8 November 2024

धक्कादायक..! भर रस्त्यात मुख्याध्यापकाची गोळ्या झाडून हत्या

ज्या मुख्याध्यापकाची हत्या करण्यात आली,ते श्री साई पब्लिक स्कूलमध्ये कार्यरत असून त्यांचे नाव शबाबुल हुसैन असल्याची माहिती समोर आली आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
उत्तरप्रदेशमध्ये (Uttar Pradesh) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पायी शाळेत जात असताना एका मुख्याध्यापकाची अचानक मागून दुचाकीस्वारांनी येऊन गोळ्या झाडत हत्या (Headmaster shot dead) केली आहे.

घडलेला हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. 
Videos 👇👇👇
(All this incident was caught on CCTV camera) त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.      
असा घडला हा प्रकार
उत्तरप्रदेशच्या मुरादाबादमध्ये दुचाकीवरून दोन हल्लेखोर आले.

मुख्याध्यापकाच्या जवळ येताच दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एका व्यक्तीने पिस्तुल काढले.

त्यानंतर लगेच गोळ्या झाडल्या. डोक्यात गोळी लागल्याने ते खाली पडले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.   
दरम्यान, ज्या मुख्याध्यापकाची हत्या करण्यात आली, ते श्री साई पब्लिक स्कूलमध्ये कार्यरत असून त्यांचे नाव शबाबुल हुसैन असल्याची माहिती समोर आली आहे.

 मुरादाबादमधील मझोला पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे.
Video👇👇👇👇

No comments:

Post a Comment