Tuesday, 26 November 2024

⭕सहलीला जाणारी बस उलटली,दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू आठ जण गंभीर जखमी

मंगळवार 26.11.2024 हिंगणा (नागपूर) / वर्धाः दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी नेणारी बस घाटात उलटल्याने एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला;तर बसमधील इतर ५१ विद्यार्थी तसेच शिक्षिका जखमी झाले.
हिंगणा-सेलू मार्गावरील पेंढरी घाटात मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला.

अपघाताची माहिती कळताच पालकांच्या हृदयाचा ठोका चुकला.
नागपूरच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली.
अपघातग्रस्त बसमधील विद्यार्थी नागपुरातील शंकरनगरातील प्रसिद्ध सरस्वती विद्यालयातील होते.
एचआरएस हायकर्स ग्रुपच्या वतीने साहसी पर्यटनासाठी विद्यार्थ्यांची ही सहल वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यात निघाली होती.
सहा बसेसमध्ये एकूण ३३५ विद्यार्थी, ९ शिक्षक,एचआरएस हायकर्सचे सहा स्वयंसेवक होते.सकाळी साडेनऊच्या सुमारास हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कवडसनजीक पेंढरी घाटातील वळणावर एमएच ४० वाय ७३५० या बसचा चालक प्रमोद सुरेश गौरखेडे (३०, जुना सक्करदरा) याने बस वेगाने घेतली.त्याचे नियंत्रण सुटले व दोन पलट्या मारत बस रोडलगतचे सुरक्षा कठडे तोडून १० फूट खोल भागात जाऊन पडली.

अचानक झालेल्या या प्रकारानंतर विद्यार्थ्यांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरून गेली 
अपघाताची माहिती
वाऱ्यासारखी नागपुरात पसरली.
सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना यामुळे मोठा धक्का बसला.
सुरुवातीला कोण-कोण विद्यार्थी-विद्यार्थिनी सुरक्षित आहेत,याची माहिती समोर आली नव्हती.
त्यामुळे सर्वांच्याच हृदयाचा ठोका चुकला.पालकांनी एम्सकडे धाव घेतली.तेथे पालकांचा आक्रोश सुरू होता.

⭕विना परमिट, पीयूसी, टॅक्सविना बस धावत होती रस्त्यावर
जाणाऱ्या बसला मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अपघात झाला. एमएच ४० वाय ७३५० क्रमांकाची ही बस वैभव काकडे यांच्या मालकीची आहे.
नागपूर ग्रामीणचे प्रादेशिक परिवहन - अधिकारी विजय चव्हाण यांना बसच्या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी
वायुवेग पथकाला अपघातग्रस्त ठिकाणी तातडीने रवाना केले. 'लोकमत'शी बोलताना त्यांनी सांगितले,बसमध्ये स्पीड गव्हर्नर बसविण्यात आले होते.

परंतु इतर महत्त्वाचे दस्तवेज जसे परमिट, रोड टॅक्स, पीयूसी प्रमाणपत्र नव्हते.फिटनेस ५ डिसेंबरला संपणार आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
विना परमिट, पीयूसी, टॅक्सविना बस धावत होती रस्त्यावर-----
⭕अपघात झालेल्या बसची स्थिती आणि दस्तऐवजांमध्ये अनेक त्रुटीही समोर आल्या आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) याची गंभीर दखल घेतली आहे. अपघातग्रस्त बस विना परमिट,विना पीयूसी व रोड टॅक्स न भरताच रस्त्यावर धावत असल्याचे तपासणीत आढळून आले.

धक्कादायक म्हणजे,अपघातानंतर बसच्या मालकाने ऑनलाइन परमिट काढण्याचा प्रयत्न केला.परंतु आरटीओच्या सतर्कतेमुळे
अपघातानंतर भरला १ लाखाचा रोड टॅक्स अपघातानंतर बसमालकाने दुपारी १२ वाजता १ लाखांचा रोड टॅक्स भरला.
शिवाय,पीयूसी प्रमाणपत्रही काढले. संबंधित पीयूसी सेंटरवर आरटीओकडून कारवाई केली जाईल,असेही चव्हाण यांनी सांगितले.अपघातानंतर परमिट काढण्याचा प्रयत्न RTO च्या दक्षतेने फसला..
⭕प्रयत्न फसला.----
चव्हाण यांनी सांगितले,एमएच ४० वाय ७३५० क्रमांकाच्या अपघातग्रस्त बसला परमिट नव्हते. सकाळी १० वाजताच्या सुमारास अपघात झाल्यानंतर दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी बसमालकाने ऑनलाइन परमिट काढण्याचा प्रयत्न केला.
परंतु अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे परमिट काढता आले नाही.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕जखमी विद्यार्थ्यांनी सांगितली आपबिती : दोनदा बस उलटली, आम्ही सर्व जिण एकमेकांवर आदळलो..
⭕बसच्या काचा फोडून बाहेर निघालो, इतरांनाही काढले!-----
नागपूर शाळेतून सहलीसाठी बस
निघाली तेव्हा प्रत्येक जण आनंदात आमच्या समोर दहावी अ,ब आणि क वर्गाच्या मिळून चार बस होत्या. आमची पाचवी बस होती.
बस भरधाव वेगात होती,पुढे वळण होतं आणि वळतानाच अचानक बस दोन वेळा उलटली.
आम्ही सर्व जण एकमेकांवर आदळलो.
बसमध्ये अडकून पडलो.प्रत्येक जण किंचाळत होता,'एक्झिट डोअर' उघडत नव्हता,
बाहेर निघण्याचा मार्ग बंद होता.
त्यामुळे बसच्या काचा फोडल्या.
बाहेर निघालो नंतर इतरांनाही बाहेर काढले.
सरस्वती विद्यालयातील वर्ग दहावीच्या ड कक्षातील विद्यार्थी भार्गव लांजेवार,गुरुप्रीत सिंग बोलत होते. अपघातानंतर जखमी ४९ विद्यार्थी,एक शिक्षक व दोन कर्मचाऱ्यांना एका खासगी बसने नागपूर मिहानमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल केले.
आकस्मिक विभागात त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. सर्व विद्याव्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव होते. त्यांना धीर देण्यासाठी त्यांच्यासोबत पालक व शाळेतील शिक्षकही उपस्थित होते.

भार्गव लांजेवार याच्या वडिलांनी सांगितले, सकाळी ६:३० वाजता मुलगा
घरून सहलीसाठी निघाला.
सकाळी ८ वाजता शाळेतून बस निघाली. सकाळी ९ वाजताच्या सुमारास अपघात झाला.
सकाळी ९:४५च्या सुमारास मित्राच्या फोनवरून अपघाताची माहिती देण्यात आली.
हातातले काम सोडून घटनास्थळी गेलो.उलटलेल्या बसची स्थिती पाहून धक्काच बसला. माझ्यासह अनेक पालक तिथे आले होते.

तेथील उपस्थित पोलिसांनी जखमी मुलांना 'एम्स'मध्ये घेऊन गेल्याचे सांगितले. तातडीने 'एम्स' गाठले. मुलाला भेटलो, जिवात जीव आला.
होता.

६० विद्यार्थ्यांना घेऊन पिकनिकला निघालेली सरस्वती विद्यालयाची बस देऊळपिंढरी घाटामध्ये उलटली. त्यानंतर घटनास्थळावरून या दुसऱ्या बसने जखमी मुलांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
⭕मित्रांना बाहेर काढताना जखमी झालो------
भार्गव लांजेवारने सांगितले, बसने दोन वेळा पलटी भारून उजव्या बाजूने कलंडली. त्यामुळे सर्व विद्यार्थी एकमेकांच्या अंगावर पडून होते. काही सीटच्या खाली अडकून पडले होते. माझ्या मानेला झटका बसल्याने प्रचंड वेदना होत होत्या. त्या स्थितीतही खिडकीची काच फोडून कसातरी बाहेर पडलो. नंतर चार ते पाच विद्यार्थ्यांना बाहेर काढले. त्यांनी इतरांना बाहेर काढले. अनेक जण रडत होते. काही ओरडत-किंचाळत होते.
काळजाचा तुकडा सुखरूप असेल ना या चिंतेत पालक होते.
⭕जखमींना केली मदत-----
गुरुप्रीत सिंगने सांगितले,अपघात झाला तेव्हा काहीच कळले नाही. कान आणि डोक्याला जखम झाली होती. परंतु, काही माझ्यापेक्षाही जे अधिक जखमी होते त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. जे किरकोळ जखमी होते ते इतरांना मदत करीत होते, धीर देत होते. अचानक झालेल्या या प्रकाराने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕अन् पालकांच्या अश्रूचा बांध फुटला!---------
शाळेत परतलेली मुले दिसताच सोडला सुटकेचा श्वास : सरस्वती विद्यालयात पालकांची धाव------
आपल्या मुलाला, मुलीला अपघातात गंभीर काही झाले नाही ना?
ही चिंता प्रत्येक पालकाच्या चेहयावर दिसत होती. त्यासाठी पालकांनी सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात विचारपूस करण्यासाठी गर्दी केली होती.

नागपूर : सरस्वती विद्यालयातील विद्यार्थी सहलीला जात असताना, हिंगणा परिसरातील देवळी पेंढरी येथे बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात कोसळली. यात एका मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती शहरभर वाऱ्यासारखी पसरल्याने, सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दुपारी १२ वाजतापासूनच शाळेत गर्दी केली. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास सहलीला
गेलेली मुले शाळेत परतल्यानंतर मुलांना बघून पालकांना गहिवरून आले, त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

सरस्वती विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची सहल बोरधरण येथे जात होती. शाळेतील दहावीचे सहाही सेक्शनचे विद्यार्थी सहलीत सहभागी झाले होते. प्रत्येक सेक्शनसाठी एक ट्रॅव्हल्स होती. अपघात झालेली बस 'डी' सेक्शनची होती. अपघात गंभीर असल्याने अख्ख्या शाळेचे प्रशासन तणावात आले होते.
शाळेतील
बहुतांश स्टाफ रुग्णालयात पोहोचला होता.तर, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या पालकांना कळल्यानंतर काहींनी शाळेशी संपर्क साधला तर काही थेट शाळेतच पोहोचले. या घटनेमुळे शाळा प्रशासनाने सहल माघारी घेतली आणि सर्व बसेस विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत पोहोचू लागल्या. पालकांची शाळेत चांगलीच गर्दी झाली होती. सर्वच पालकांचे टेन्शन वाढले होते. चेहऱ्यावर तणाव झळकत होता. महिला, पालकांचा अश्रूचा बांध फुटला होता. शाळेच्या प्रशासनाकडून बस परत येत आहेत, एवढीच माहिती दिली जात होती. 

त्यामुळे आपला मुलगा, मुलगी सुखरूप तर आहे ना? याची हुरहूर पालकांना लागली होती. सर्वांत पहिले 'ब' सेक्शनची बस शाळेत पोहोचली. शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन व वर्गात गेले. विद्यार्थ्यांची हजेरी घेतल्यानंतर त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलांना सुखरूप बघून शाळेतील वातावरण गहिवरून आले होते.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕अपघातग्रस्त ४६ विद्यार्थ्यांना तातडीने उपचार------
सरस्वती विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना मंगळवारी सहलीसाठी घेऊन जाणाऱ्या बसला झालेल्या अपघातात जखमी झालेल्या ४६ विद्यार्थ्यांसह एक शिक्षक व दोन स्वयंसेवकांवर नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) तातडीने उपचार करण्यात आले.

यात गंभीर जखमी झालेल्या एका विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शिक्षकासह चार विद्यार्थ्यांना वॉर्डात भरती करण्यात आले,तर उर्वरित ३५ विद्यार्थ्यांना सायंकाळपर्यंत सुटी देण्यात आली. भरती असलेल्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे 'एम्स' प्रशासनाचे म्हणणे आहे.
सहलीला जात असताना सकाळी ९ वाजताच्या सुमारास सर्वात मागील पाचवी बस देवरी-पेंढरी गावाजवळील वळणावर उलटली. बसमध्ये एक शिक्षक व दोन स्वयंसेवकासह ५२ विद्यार्थी होते. यातील सात विद्यार्थ्यांना निम्स या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले,तर उर्वरित शिक्षक,स्वयंसेवकासह ४६ विद्यार्थ्यांना 'एम्स'मध्ये सकाळी ११ वाजताच्या सुमारास दाखल करण्यात आले. 'एम्स'चे संचालक डॉ. प्रशांत जोशी यांच्या पुढाकारात वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवेकर यांच्या मार्गदर्शनात आपत्कालीन विभागातील डॉक्टर,परिचारिका व कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचाराची सोय उपलब्ध केली.
हे सर्व विद्यार्थी १५ ते १६ वयोगटांतील आहेत.
निर्वाणी बागडे या विद्यार्थिनीला रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

आपत्कालीन विभागात उपचारासाठी ठेवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांवर उपचार करून किरकोळ जखमी असलेल्या ३५ विद्यार्थ्यांना डे-केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. सायंकाळी ५.३० वाजता सर्वांना सुटी देण्यात आली.
⭕गंभीर जखमी अवस्थेत आलेल्या एका विद्यार्थ्यावर डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया केली. अपघातामुळे त्याच्या मूत्राशयला गंभीर इजा झाली होती. शस्त्रक्रियेनंतर त्याला बालरोग विभागाच्या अतिदक्षता विभागात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
जखमी विद्यार्थ्यांमध्ये दोन विद्यार्थ्यांचे हात फॅक्चर झाले.
दोन विद्यार्थ्यांना गंभीर स्वरूपातील जखमा असून,एक शिक्षकाला पाठीच्या कण्याला फ्रैक्चर व छातीत जखमा असल्याने या सर्वांना वॉर्डात उपचारासाठी ठेवण्यात आले.

२४ जणांचा सीटी स्कॅन व १८२ एक्स-रे

अपघाताची तीव्रता पाहता 'एम्स'च्या डॉक्टरांनी २४ जणांचा सिटी स्कॅन व १८२ जणांचा एक्स-रे काढला. या दोन्ही तपासणी अहवालातून आंतरिक जखमा आणि हाडांच्या दुखापतींची तपासणी करण्यात आली.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕शाळेतील शिक्षकही तणावात--------
घटनेची माहिती मिळाल्यानंतर शाळेत प्राथमिक विभागाचे शिक्षक होते. शाळा व्यवस्थापनाने उपस्थित सर्व शिक्षकांना अलर्ट केले होते. वर्गावरील शिक्षक स्टापा रूममध्ये येऊन विद्यार्थ्यांच्या पालकांना घटनेची सूचना देत होते.

घटनेनंतर माघारी येणाऱ्या बसेसलाही शाळेत  पोहोचायला ४ तासांचा कालावधी लागल्याने शाळेतील शिक्षकही तणावात होते.
एक एक करता पाच बसेस शाळेत पोहोचल्यानंतर आणि त्यांच्या पालकांनी मुलांना घरी घेऊन जाईपर्यंत शिक्षक दडपणात होते. दरम्यान, त्यांनी माध्यमांशी बोलणेही टाळले.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕मुख्याध्यापकांनी कागदपत्रे तपासावी----
शालेय बससह इतर खासगी बसेसची तपासणी आरटीओच्या पथकाकडून वेळोवेळी केली जाते. परंतु जर एखाद्या शाळेने सहलीसाठी बस भाड्याने घेत असाल तर प्राचार्य किंवा मुख्याध्यापकांनी बसची कागदपत्रे तपासून घ्यायला हवी.
बसच्या चालकाचीही तपासणी करावी.
काही दोष आढळून आल्यास आरटीओला याची माहिती द्यावी,असे आवाहनही चव्हाण यांनी केले.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया------
नागपुरातील अपघाताच्या घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'सरस्वती हायस्कूलच्या सहलीतील वाहनाचा एक दुर्दैवी अपघात झालाय. त्यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. ही घटना अतिशय दुःखद आहे. त्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. या अपघातात काही विद्यार्थी जखमी झाले आहेत.त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर एम्स रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यांना सर्वतोपरी मदत जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. स्वतः जिल्हाधिकारी यांनी एम्समध्ये भेट देऊन पालकांशी संवाद साधला आहे. मी सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे'.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
लोकमत

No comments:

Post a Comment