Friday, 29 November 2024

मुंबईत पुन्हा ‘बदलापूर’..! लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांकडून शाळेतील 3 चिमुकलींचा विनयभंग

भांडुपमधील एका नामांकित शाळेत पुन्हा एकदा बदलापूरसारखीच घटना समोर आली आहे. लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांकडून शाळेतील तीन चिमुकलींचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
बदलापूरच्या शाळेत घडलेल्या घटनेने राज्य़ासह देशातील समाजमन ढवळून निघाले होते. अशीच घटना मुंबईच्या भांडुप येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे.
भांडुपमधील एका नामांकित शाळेत पुन्हा एकदा बदलापूरसारखीच घटना समोर आली आहे.
लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांकडून शाळेतील तीन चिमुकलींचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

 नामांकित शाळेत योगासने शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थिनीसोबत हा संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. विद्यार्थिनीनी हा प्रकार घरी सांगितल्याने ही घटना समोर आली. याप्रकरणी पोलिसांमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शाळेच्या बेसमेंटमध्ये १० व ११ वर्षीय दोन मुली योगासने करत होत्या. दरम्यान शाळेतील लिफ्टची सफाई आणि देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून या चिमुकलींची छेडछाड करण्यात आली. त्यानंतर या विद्यार्थीनींनी या प्रकाराची तक्रार योगा शिकणाऱ्या शिक्षिकेसह आपल्या पालकांकडे केली.

यानंतर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बेसमेंटमध्ये असलेले सीसीटीव्हीची तपासणी केली असता या संपूर्ण प्रकरणाची सत्यता उजेडात आली. धक्कादायक बाब म्हणजे,लिफ्ट ग्राऊंड फ्लोवरवर संपते.
मात्र लिफ्टची सफाई आणि देखभाल करणाऱ्या कर्मचारी बेसमेंटमध्ये पडद्याच्यामागे लपल्याचे आढळून आला. 
चिमुकल्यांच्या विनयभंगप्रकरणी भांडुप पोलिसांनी तक्रार नोंदवत गुन्हा दाखल केला आहे.
यात भारतीय न्याय संहिता ७४,७८ आणि POCSO ८,१२ अंतर्गत गुन्हा नोंदवत संशयित आरोपीला अटक केली आहे. कुटुंबियांनी आरोप केला की,प्रकरण दाबण्यासाठी व पोलिसात तक्रार करू नये यासाठी शाळेकडून दबाव टाकण्यात आला. तसेच जेव्हा पालकांना सीसीटिव्ही पुटेजही पाहू दिले नाही.
माहिती:-HT MARATHI 

मुंबईच्या एका शाळेत तीन अल्पवयीन विद्यार्थीनींसोबत हा सगळा प्रकार केला. लिफ्टची दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्याने शाळेतील मुलींचा विनयभंग केला. शाळेच्या तळघरातच योग शिकणाऱ्या मुलींचा विनयभंग झाल्याने शाळा प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मुलींच्या साक्षीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment