पाचवीच्या विद्यार्थ्यांचे केले अपहरण हॉटेल चालक शिक्षकाने घडवली पालकांची भेट-घरून क्लासला निघालेल्या सुरज कुमार अरविंद सोनवणे या पाचवीच्या विद्यार्थ्याला दुचाकीवरून आलेल्या एका जणांनी रुमाल सुगवून त्यांचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी घडले
ममुराबाद गावच्या पुढे बेदरलेल्या अवस्थेत हा बालक आढळून आला तेथील हॉटेल चालक व प.न. लुंकड कन्या शाळेच्या शिक्षकांमुळे या बालकाची तात्काळ आई-वडिलांची भेट झाली मुलाला पाहताच त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या उधारा वाहू लागल्या.
मिळालेल्या माहितीनुसार सुरज कुमार हा पंचमुखी हनुमान मंदिराच्या पाठीमागे असलेल्या सेंट लॉरेन्स स्कूलचा विद्यार्थी असून पाचवी क च्या वर्गात शिक्षण घेत आहे
सोमवारी त्याची सकाळची शाळा होती दुपारी चार ते सहा वेळेत क्लास असल्याने तो दप्तर घेऊन शिवाजी नगरातून क्लास कडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या एका जणांनी त्याच्याजवळ थांबून तोंडाला रुमाल सुंगविला त्यानंतर मामुराबाद गावच्या पुढे आधार भालचंद्र शिंदे यांच्या शेतातील मुंजोबाच्या मंदिराजवळ या बालकाला सोडून दिले तेथून काही अंतरावर नरेश गोकुळ शिंदे या हॉटेल चालकांना हा बालक भेदरलेल्या अवस्थेत रडत असतानाचा नजरेस पडला
🍁🍁मायेने जवळ घेत बोलते केले--सुरुवातीला अर्धा तास हा बालक काहीच बोलत नव्हता त्याच्याजवळ शाळेची दप्तर होते त्याला मायेने जवळ घेत पाणी व चहा दिला त्यानंतर त्याला बोलते केले सेंट लॉरेन्स शाळेत शिक्षण घेत आहे इतकेच तो सांगत होता
⭕ नरेश पाटील यांनी मुलाचा फोटो काढून त्यांच्या ओळखीचे शिक्षक विजय सिंग पाटील यांना पाठवून घटनेची माहिती दिली या शिक्षकांनी घटनेची गांभीर लक्षात घेत त्यांच्या शाळेचे पर्यवेक्षक यांना माहिती कळवली काही मिनिटात बालकाची ओळख पटवून त्यांच्या पालकांची संपर्क साधला
⭕गुरू हे विद्यार्थ्यांचे दुसरे आई-वडील असतात ⭕
No comments:
Post a Comment